बंजारा समाजाचा आत्मबळ हिमालयापेक्षाही प्रबळ !

31 Jan 2023 19:11:54
मानोरा, 
बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात समर्थ  (banjara community) लोक आहे केवळ महाराष्ट्रच नाही तर आंध्र, तेलंगणा देशभरातील या समाजातील लोक मोठे विर,पराक्रमी असल्याचे मी पाहिले आहे. बंजारा समाजाला छोट्या - मोठ्या प्रलोभनामुळे कुणी आपल्या मुळ धर्मापासून वेगळे करू शकत नसल्याचे प्रतिपादन बंजारा, लभाना नायकडा यांचे खान्देश मधील गोदरी येथे धर्म जागरण मंचाकडून आयोजित कुंभ मेळाव्यात योग गुरु रामदेव बाबा यांनी प्रतिपादन केले.
 

rtrtrtr 
 
खान्देशातील या कुंभामध्ये पुरोगामी विचारांचे संत सेवालाल महाराज  (banjara community) यांच्या कुळातील संत बाबूसिंग महाराज, संजय महाराज, कबीरदास महाराज यांच्या समवेत तालुका आणि वाशीम जिल्ह्यातील हजारो समाज बांधवांनी २५ ते ३० तारखे दरम्यान या भव्य दिव्य कार्यक्रमाला उपस्थिती लावली. देशाच्या विविध राज्यांमध्ये निवास करीत असलेल्या बंजारा, लभाना आणि नायकडा समाजातील काही कुटुंबे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असू शकतात. परंतु, ह्या अभावामुळे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब,राजस्थान, मध्य प्रदेश हरियाणा आणि देशभरातून या कुंभामध्ये सामील होण्यासाठी आलेल्या बंजारा, लभाना, नायकडा समाजाचे हिंदू धर्म आणि धर्म जागरण मंचाकडून उपस्थितांना बाबा रामदेव यांनी प्रणाम केले. वेगवेगळ्या कालखंडामध्ये भेदभाव झाला असेल त्यामध्ये न पडता हिंदू धर्मामध्ये समाजासमाजात आता भेदभाव नाही. वेगवेगळ्या कालखंडात कुणी काय केले यावर आपण आता जाऊ नये, हिंदू धर्माने कधीच कुणामध्ये भेदभाव पाहिले नाही तर प्रत्येकामध्ये परमात्मा पाहिलेले आहे. भीती दाखवून, प्रलोभनाने, क्रूरतेने आमच्यापासून दुरावलेल्या आमच्या मुळ बांधवांना आम्हाला परत आमच्या मध्ये सामील करून घेण्याचे आवाहन रामदेव बाबांनी यावेळी उपस्थितांना केले.
 
इतर धर्मीयांनी आमच्या समाज (banjara community)  बांधवावर धर्म परिवर्तनाच्या माध्यमातून केलेले पाप आता धुऊन काढण्याची वेळ आता आल्याची गोदरीला आलेल्या नागरिकांनी येथून जातेवेळी संकल्प रूपाने करून जाण्याचे आवाहनही बाबा रामदेव यांनी विशेषत्वाने केले. देशभरातील बंजारा सहित जे समुदाय विविध क्षेत्रात माघारलेले आहेत त्यांच्यासाठी हजारो शैक्षणिक संस्था स्थापन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही शय ते सर्व प्रयत्न करू असे उपस्थितां समोर बाबा रामदेव यांनी प्रतिपादन केले. बंजारा, लभाना आणि नायकडा समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपले कुटुंब,समाज आणि राष्ट्रांमध्ये अधर्म वाढू न देण्याचा संकल्प येथून घेऊन जाण्याचे आवाहन योगी रामदेव बाबा यांनी लाखोच्या संख्येत जमलेल्या जनसमुदायासमोर केले.
Powered By Sangraha 9.0