चावके कुटूंबियांकडून ‘माणुसकीचा घास’ !

31 Jan 2023 18:25:48
गडचिरोली,
येथील पंचवटी नगरातील गजानन चावके (food donation)  कुटुंबीयांकडून मुलाचे पुण्यस्मरण व नातवाचे वाढदिवस अशा दोन्हीचे औचित्य साधून स्थानिक महिला रुग्णालयात अन्नदान करण्यात आले.
 
 

ererer 
 
 
स्थानिक माजी नगरसेवक संजय मेश्राम यांनी अन्न वाया (food donation) न जाता खर्‍या गरजुंना अन्नदान चळवळ या अंतर्गत वाढदिवस, स्मृतिदिन आदी ’माणुसकीचा घास’ या नविन उपक्रमास सुरुवात केली आहे. यात गजानन चावके यांचा मुलगा कपिल चावके याचे मागील दोन वर्षापूर्वी अपघातात निधन झाले. त्यानंतर त्याच दिवशी एक वर्षानंतर लहान मुलाला मुल जन्माला आले. या दोन्ही घटनांचा दिवस एकच असल्याने कोणताही सोहळा साजरा न करता गरजू नागरिकांना अन्नदान म्हणून जेवणाचे डब्बे देण्याचा निर्णय चावके कुटुंबियांनी घेतला. या उपक्रमांतर्गत स्थानिक महिला रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करून माणुसकीचा घास दिला. यावेळी वडील गजानन चावके, आई वंदना चावके, पत्नी रुपाली चावके, मुलगी रुत्वी चावके, भाऊ कुणाल चावके, शरयू चावके, मावशी स्मिता कळमकर, गायत्री कळमकर, मामा अजय काळे, बहिण काजल मानकर, जावई अजिंक्य मानकर, माजी नगरसेवक संजय मेश्राम आदींसह नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0