विद्यापीठाच्या अमृत क्रीडा व कला महोत्सवाचा बक्षीस वितरण संपन्न !

31 Jan 2023 18:21:16
गडचिरोली, 
गोंडवाना विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण (sports and cultural feast)  तसेच विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील 350 शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांसाठी 27 ते 29 जानेवारी अशा तिन दिवसीय अमृत क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी 29 जानेवारीला या महोत्सवाचा बक्षिस वितरण समारंभ पार पडला.
 

erererer 
 
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, विशेष अतिथी (sports and cultural feast)  म्हणून नागपूर येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रॉकस्टार डॉ. केदार सिंग सी. रोटेले (केड्राक), प्रमुख अतिथी म्हणून बोधी फॉऊंडेशन नागपूरचे ललित खोब्रागडे, अर्चना खोब्रागडे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, सिमा लाडे हिरेखन, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, यवतमाळचे कबड्डीपट्टू लक्ष्मण पवार , विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र देव, मानव विज्ञान अधिष्ठाता डॉ. चंद्रमाऊली, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अनिता लोखंडे, डॉ. विजय सिल्लारे, अधिसभा सदस्य सतीश पडोळे, विजयकुमार घरत, मनोहर जाधव, प्रशांत रंदई, अरूण जुनघरे आदी उपस्थित होते. यावेळी विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
 
यावेळी ललित खोब्रागडे म्हणाले, वैरागड  (sports and cultural feast)  हे माझे जन्मगाव आहे. त्यामुळे येथील नागरिकांशी मला जिव्हाळा आहे. येथील लोकांच्या कला, कौशल्याला वाव देण्यासाठी कार्य करणार असल्याचे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय रॉकस्टार केदारसिंग रोटेले म्हणाले, दोनशेहुन अधिक देशांमध्ये आमची केड्राक संस्था काम करत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कलेला वाव देण्यासाठी एक सेंटर इथे तयार करण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, या स्पर्धा नव्हत्या तर उत्सव आहे. प्रत्येकाच्या अंगी एक तरी कला असतेच या कलेला वाव देण्यासाठी हा अमृत क्रीडा व कला उत्सव होता, असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल आणि कबड्डीपटु लक्ष्मण पवार यांनीही आपले मनोगत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिता लोखंडे यांनी केले. संचालन मनिषा फुलकर तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी मानले. या कार्यक्रमाला सहभागी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी माजी जिल्हा क्रीडा अधिकारी मदन टापरे आणि गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0