मनमानी करणार्‍या ग्रामविकास अधिकार्‍यावर कारवाई करा !

31 Jan 2023 18:43:47
चामोर्शी, 
शासनाचे नियम धाब्यावर बसवून ग्रामपंचायत  (village development officer) सदस्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेणे, लिहिलेल्या मासिक सभेचे कार्यवाही बुक वाचून न दाखवणे व सदस्यांचे कोणतेही प्रश्‍न मांडण्यासाठी सहकार्य न करणार्‍या ग्रामविकास अधिकार्‍यांची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी सुभाष कोठारे व अन्य सदस्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
 
 

rererer 
 
 
शासकीय नियमाला बगल देत ग्रामपंचायत  (village development officer)  आमगाव महाल येथील ग्राम विकास अधिकारी दीपक कांबळे यांनी तहकूब मासिक सभा 27 जानेवारी 2023 च्या कार्यवृत्तांत रजिस्टरला विषय क्रमांक 1 ते 6 पर्यंतचा अहवाल लिहिण्यास नकार दिला. तसेच मासिक सभा तहकूब असल्यामुळे या सभेत जमा-खर्च किंवा विषय सुचित अन्य विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर अथवा नामंजूर होणार नाही असे सांगितले व याबाबत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 36 व अन्य शासकीय परिपत्रकाची मागणी केली असता आपण विस्तार अधिकारी काळबांधे यांच्या सूचनेप्रमाणे मासिक सभेचे कार्यवाही वृत्तांत लिहीत असल्याचे सांगितले व मासिक सभेची कार्यवाही वाचून दाखवली नाही. त्यामुळे संबंधित सदस्यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन ग्रामविकास अधिकार्‍याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य सुभाष कोठारे, भाऊराव देवतळे, निकेश जुवारे, निर्मला वासेकर उपस्थित होते. याविषयी ग्राम विकास अधिकारी दीपक कांबळे यांना विचारणा केली असता, आपण नियमानुसारच काम केले असून ग्रापं पदाधिकार्‍यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0