पत्रकारिता - एक अंगारवाट !

04 Jan 2023 05:00:00
चिंतन 
 
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर
 
Journalism जगभरात पत्रकारितेचे अनेक प्रकार उदयास आले. अगदी छपाईपासून ते तंत्रज्ञानाच्या पलीकडे. पत्रकारिता ही आपल्या मानवी समुदायाची पायाभूत गरज होती, आहे आणि नेहमीच राहील. Journalism पत्रकारांच्या अभिव्यक्तीतील एक समान धागा म्हणजे त्यांची स्वतंत्र विचारसरणी; सामान्य विचार व्यक्त करण्यासाठी शब्द, कल्पना आणि सिद्धांत वापरण्याची कला. पत्रकारिता म्हणजे आत जे आहे ते मोकळे सोडण्याचे साधन. Journalism हे विचार अत्यंत प्रामाणिक आणि निःपक्षपाती पद्धतीने वाचकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत, दर्शकांपर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी हे लोक लेखन, वृत्तांकन, बातम्या इत्यादींच्या माध्यमातून पार पाडत असतात. जेम्स डब्ल्यू. केरी यांच्या ‘अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ जर्नलिझम फॉर जर्नलिस्ट्स : अ प्रपोजल अ‍ॅण्ड एस्से'मध्ये त्यांनी पत्रकारिता आणि लोकशाही यांच्यातील समांतरता व्यक्त केली आहे. Journalism लोकशाहीच्या संस्था किंवा आत्म्याशिवाय पत्रकार हे प्रचारक किंवा मनोरंजन करणारे म्हणून कमी होतात. लोकशाहीची आवड पत्रकारांना जनतेसोबत असणे आवश्यक आहे, कारण त्या परस्पर संस्थात्मक संस्था आहेत. लोकशाहीशिवाय पत्रकारितेला तरणोपाय नाही. Journalism
 
 
chint
 
Journalism गेल्या काही वर्षांत पत्रकारितेत अनेक बदल झाले आहेत. पत्रकारितेच्या अभिव्यक्तीचा मुद्दा सदैव उपस्थित असताना उद्योग एका माध्यमातून दुस-या माध्यमात विकसित झाला आहे. सर्वात जुने ज्ञात पत्रकारितेचे उत्पादन हे प्राचीन रोममध्ये प्रसारित होणारे ख्रिस्तपूर्व ५९ मधील ‘दी अ‍ॅक्टा डायुरना' नावाचे वृत्तपत्र होते. दी अ‍ॅक्टा डायुरनाने सार्वजनिक भाषणासारख्या महत्त्वाच्या दैनंदिन घटनांच्या नोंदी केल्या. ते दररोज प्रकाशित झाले आणि प्रमुख ठिकाणी टांगले गेले. Journalism चीनमध्ये तांग राजाच्या काळात ‘बाओ' (रिपोर्ट) नावाचे न्यायालयीन परिपत्रक सरकारी अधिका-यांना जारी करण्यात आले होते. हे राजपत्र १९११ पर्यंत किंग  राजघराण्याच्या अंतापर्यंत कमी-अधिक प्रमाणात आणि विविध नावांनी प्रसिद्ध झाले. जर्मन शहरांमध्ये आणि अँटवर्पमध्ये १६०९ च्या सुमारास पहिले नियमितपणे प्रकाशित होणारे साप्ताहिक वृत्तपत्र प्रकाशित झाले. १६२२ मध्ये पहिले इंग्रजी वृत्तपत्र, साप्ताहिक प्रकाशित झाले. Journalism पहिल्या दैनिक वर्तमानपत्रांपैकी एक, ‘द डेली कौरंट' १७०२ मध्ये प्रकाशित झाले. १९६० मध्ये बेंजामिन फ्रँकलिनपासून अमेरिकन पत्रकारितेचा जन्म झाला.
 
 
 
आपल्या भारतात वृत्तपत्राला सुरुवात अठराव्या शतकातच झाली. Journalism मात्र प्रकाशित झालेले हे वृत्तपत्र भारतीय व्यक्तीने केले नाही किंवा भारतीय भाषेत झाले नाही. भारतात प्रकाशित झालेले पहिले वृत्तपत्र हे इंग्रजी भाषेतील ‘बंगाल गॅझेट' आहे. १७५७ मधील प्लासीच्या लढाईनंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता बंगालमध्ये बळकट झाली. याच ईस्ट इंडिया कंपनीतील एक कर्मचारी जेम्स आगस्टस हिक्की याने कोलकाता येथे बंगाल गॅझेट हे वृत्तपत्र १७८० साली सुरू केले. Journalism बंगाल गॅझेट हे एक साप्ताहिक होते. येथून भारतात वृत्तपत्राची सुरुवात झाली. हिक्की गॅझेट म्हणूनही बंगाल गॅझेट ओळखले जात होते. हिक्की गॅझेटच्या पहिल्या अंकामध्ये जेम्स आगस्टस हिक्की याने स्वत:ला कंपनीचा मुद्रक म्हणून घोषित केले होते. Journalism बंगाल गॅझेट सुरू करण्यामागील कारण हिक्कीने स्पष्ट केले होते की, ईस्ट इंडिया कंपनीमधील अधिका-यांनी केलेल्या भ्रष्टाचार आणि लुटीला वाचा फोडण्यासाठी पत्रकारितेचे कार्य सुरू करत आहे. संपादकीय स्तंभ लेखनाची सुरुवात बंगाल गॅझेटपासूनच झाली. या स्तंभलेखनातून जनतेच्या भावना व्यक्त करण्याची सुरुवात भारतात झाली. Journalism फिलन थ्रोप्स याने २५ मार्च १७८० च्या प्रकाशित झालेल्या अंकामधील संपादकीय लेखात कोलकात्यामधील पोर्तुगीज स्मशानभूमीमधील अस्वच्छतेबद्दल लिहिले होते.
 
 
Journalism तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनीमधील अधिका-यांनी कंपनीच्या व्यापरासोबतच खाजगी व्यापर सुरू केला होता. शिवाय भ्रष्टाचार आणि लूटही चालूच होती. जेम्स आगस्टस हिक्की याने या सर्व बाबी उजेडात आणल्या. वृत्तपत्राच्या माध्यमातून हिक्कीने या अधिका-यांचा भंडाफोड केला. Journalism त्यामुळे त्या भ्रष्ट अधिका-यांनी हिक्कीला या कार्यापासून रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला. जेम्स ऑगस्टस हिक्की हा खरोखरच एक हाडाचा पत्रकार होता. त्या काळात त्याने खूप मोठी हिंमत दाखविली होती. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल वारेन हेस्टिंग्स याने जनरल पोस्ट ऑफिसद्वारे बंगाल गॅझेटच्या वितरणावर बंदी घातली कारण, हिक्कीने ईस्ट इंडिया कंपनीमधील काही प्रमुख अधिका-यांच्या खाजगी बाबतीत कठोर शब्दांत टीका केली होती. एवढे होऊनही हिक्की थांबला नाही. त्याने गव्हर्नर जनरल वारेन हेस्टिंग्स याच्यावरही टीका करणे सुरू केले. Journalism हिक्कीने आपल्या बंगाल गॅझेटमध्ये वारेन हेस्टिंग्सला विविध नावांनी संबोधित केलेले आढळते. हिक्कीने वारेन हेस्टिंग्स याचा उल्लेख मिस्टर राँगहेड, द डिक्टेटर, द ग्रेट मुघल अशी विशेषणे वापरून केला आहे. बंगाल गॅझेटच्या एका अंकात हिक्कीने वारेन हेस्टिंग्स, त्याची पत्नी आणि मुख्य न्यायाधीश सर एलीज इम्पी यांचे चारित्र्यहनन केले. Journalism त्यामुळे हिक्कीवर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. हिक्कीवरील आरोप सिद्ध झाले. हिक्कीला दंड तसेच तुरुंगवास असा दुहेरी फटका बसला.
 
 
गव्हर्नर जनरल वारेन हेस्टिंग्स याने बंगाल गॅझेटच्या प्रकाशनासाठी उपयोगात आणले जाणारे टाईप्स जप्त केले तसेच हिक्कीच्या प्रेसवरही बंदी घातली. अशाप्रकारे मार्च १७८२ ला बंगाल गॅझेटचे प्रकाशन बंद झाले. Journalism बंगाल गॅझेटच्या रूपाने भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू झाले आणि बंदही झाले. मात्र भारतात वृत्तपत्राची सुरुवात झाली. त्यानंतर १७८९ मध्ये मुंबईत पहिले वृत्तपत्र प्रकाशित झाले, ज्याचे नाव ‘बॉम्बे हेराल्ड' असे होते. त्याच्या प्रकाशनाच्या दुस-याच वर्षी ‘बॉम्बे कुरिअर' नामक आणखी एक वृत्तपत्र उदयास आहे, जे नंतर ‘टाईम्स ऑफ इंडिया' या भारतातील प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रात विलीन झाले. १८१७ पर्यंत भारतात जितकी वृत्तपत्रे प्रकाशित झाली ती इंग्रजी भाषेतच होती. Journalism १८१८ मध्ये ‘समाचार दर्पण' नामक पहिले भारतीय भाषेतील वृत्तपत्र प्रकाशित झाले. हे वृत्तपत्र बंगाली भाषेत होते. ज्याची स्थापना बाप्टिस्ट मिशनरी सोसायटी नामक संस्थेद्वारे करण्यात आली होते. Journalism १ जुलै १८२२ मध्ये ‘बॉम्बे समाचार' हे दुसरे भारतीय भाषेतील वृत्तपत्र गुजराती भाषेत प्रकाशित करण्यात आले होते.
 
 
‘दर्पण' या मराठी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राची सुरुवात बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी केली होती. Journalism दर्पण दोन रकान्यांमध्ये प्रकाशित होत होते, एका रकान्यामध्ये वृत्तपत्र मराठीत, तर दुस-यामध्ये वृत्तपत्र इंग्रजी भाषेतून छापले जात होते. ‘दर्पण' या मराठी वृत्तपत्राच्या सुरुवातीमुळेच बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटले जाते. १८३२ मध्ये सुरू झालेल्या दर्पण वृत्तपत्राचे प्रकाशन १८४० दरम्यान थांबविण्यात आले. Journalism १८५४ च्या दरम्यान ‘सुदा दर्शन' हे पहिले हिंदी भाषेतील वृत्तपत्र प्रकाशित झाले. १८५४ नंतर इतर भारतीय भाषांतील वृत्तपत्रे प्रकाशित होण्यास सुरुवात झाली आणि अशा प्रकारे भारतात वृत्तपत्र क्षेत्राचा विस्तार वाढत गेला. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतीय वृत्तपत्रांचा मोलाचा वाटा मानला जातो. कारण क्रांतिकारकांनी जनजागृतीसाठी वृत्तपत्रांचेच साहाय्य घेतले होते. Journalism ‘द हिंदू' हे भारतातील पहिले ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक वृत्तपत्र आहे ज्याची सुरुवात १९९६ मध्ये झाली होती. हातात पेन घेऊन कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले असून, पत्रकारांनी काळाबरोबर स्वतःला अद्ययावत केले पाहिजे.
 
 
Journalism सध्याचे युग डिजिटल माध्यमाचे असून, फाईव्ह जी सुरू झाल्यामुळे माध्यमात आणखी क्रांतिकारक बदल होत आहेत. कागदाचे वाढलेले भाव आणि एकदंरीत खर्च यामुळे येत्या पाच वर्षांत अनेक वृत्तपत्रे बंद पडून त्याची जागा ई-पेपर घेतील, पण हे ई-पेपर वाचण्यासाठी पैसे मोजावे लागतील. Journalism सध्या चालू असलेल्या वृत्त वाहिन्यांना देखील घरघर लागेल आणि स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून अनेक डिजिटल वाहिन्या उदयास येतील. डिजिटल माध्यम हेच भविष्य असल्याने पत्रकारितेत कार्यरत असलेल्या प्रत्येकाला त्याचे सर्व ज्ञान असायला हवे. समाज माध्यमांमुळे पत्रकारांची मक्तेदारी संपली असून, आज प्रत्येक जण पत्रकार झाला आहे. वर्तमान काळात भारतीय वृत्तपत्र क्षेत्र हे जगातले दुस-या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र मानले जाते. जिल्हा स्तरावरील अनेक वर्तमानपत्रे व नियतकालिके ही पत्रकारिता कमी व ‘ब्लॅकमेलिंग'चे प्रकार जास्त करतात, असा आरोप नेहमीच केला जातो. Journalism मग स्वतःस ‘मोठी' समजणारी व राज्य स्तरावरील वृत्तपत्रे व त्यांचे मालक हेच काम मोठ्या पातळीवर करीत आहेत व पुन्हा राज्यकर्त्यांच्या मांडीस मांडी लावून बसलेले दिसतात.
 
 
खाण घोटाळ्यांपासून बँक घोटाळ्यांपर्यंत अडकलेले अनेक लोक आज वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे मालक आहेत व त्यांच्याही वृत्तपत्रांना सरकारी जाहिरातीचा मलिदा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. Journalism यातील अनेक मालक व पत्रकार राजकीय पक्षांचे बोट धरून संसद व विधानसभेत पोहोचले. ही सर्व मोठी वृत्तपत्रे आज सत्ताधारी पक्षांना हवी आहेत. पण छोट्या वृत्तपत्रांना त्यांना मारायचे आहे. ‘केसरी', ‘दर्पण' व ‘सुधारक' या वर्तमानपत्रांचा वारसा सांगणारा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे वृत्तपत्रे व नियतकालिके टिकवून ठेवणे गरजेचे आहे. एकेकाळी देशातील शोधपत्रकारिता खèया अर्थाने व्यवस्थेला आव्हान देत होती. आणिबाणीच्या काळातील कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केले गेलेले गैरप्रकार रोखण्यामध्ये पत्रकारितेचा मोठा वाटा आहे. Journalism १९८१ मध्ये अश्विनी सारीन यांनी उत्तर हिंदुस्थानातील मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. ‘द हिंदू' मधील बोफोर्स प्रकरणावरील लेखांमुळे भ्रष्टाचार हा पहिल्यांदाच सार्वजनिक मुद्दा बनला. २००१ मध्ये तहलका इंडियन क्रिकेटमधील मॅच फिक्सिंग प्रकरणातील एक मोठे स्कँडल उघडकीला आणले होते. २०१० मधील ओपन मॅगझिनमध्ये टू जी स्पेक्ट्रम स्कॅम उघडकीस आले. Journalism मोठ्या प्रकरणांच्या जोडीला आवर्जून उल्लेख करायला हवा असे काम छत्तीसगडमधील ‘सी जी नेट स्वरा' हे मीडिया चॅनल करत आहे.
 
 
२०१० मध्ये स्थापन झालेल्या या माध्यमातून शुभ्रांशू चौधरी गरीब गावक-यांचे स्थानिक पातळीवर होणारे शोषण रोखण्याचा प्रयत्न करतात. Journalism  उदाहरणादाखल, एका अधिका-याने मनरेगा अंतर्गत काम करणा-या कामगारांना पगार देण्यास नकार दिला आणि त्याचे रेकॉर्डेड वक्तव्य कम्युनिटी रेडिओवर जाहीर करण्यात आले. या घटनेकडे माध्यमांचे लक्ष वेधले गेले आणि सरकारने संबंधित व्यक्तीवर कारवाई केली. Journalism  कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्टने (सीपीजे) अतिशय काळजीपूर्वक आणि सूक्ष्म पद्धतीने चौकशी करून पत्रकारितेमुळे मारल्या गेलेल्या जगभरातील पत्रकारांची यादी बनवली आहे. या यादीत १९९२ पासूनच्या १३५० पत्रकारांचा समावेश आहे. त्यापैकी ५० पत्रकार भारतीय आहेत. त्याच वर्षी जगभरातील पत्रकारांच्या हत्येबद्दल माहिती जमवण्यास एका सामाजिक संस्थेने सुरुवात केली. Journalism ही संस्था न्यू यॉर्कमध्ये १९८१ मध्ये स्थापन झाली असून, जगभरातील पत्रकारांना धोका व सूडापासून वाचवणे या कामासाठी कार्यरत आहे. भारतात १९९२ पासून मारल्या गेलेल्या ५० पत्रकारांपैकी ३५ जण हे बातमी किंवा भाष्य केल्याने अगर करण्यापासून रोखण्यासाठी मारले गेले, तर उरलेल्या १५ जणांना नेमून दिलेले धोकादायक काम करताना किंवा युद्ध व इतर ठिकाणी होत असलेल्या गोळीबारात जीव गमवावा लागला. Journalism
 
 
साधना साप्ताहिकाचे सन्माननीय संपादक म्हणून डॉ. दाभोळकरांचा समावेश अशा मारल्या गेलेल्या पत्रकारांमध्ये होतो. बहुसंख्य पत्रकार राजकारण आणि भ्रष्टाचार या विषयांचे वार्तांकन किंवा शोधपत्रकारिता करीत होते. त्याचबरोबर, जातीयवादी राजकारण व सामाजिक ध्रुवीकरणामुळे भारतभरातील परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचे सीपीजेचा अहवाल निर्देशित करतो. Journalism मे २००४ ते २०१४ या काळात संपूर्ण भारतातून १० पत्रकार मारले गेले, परंतु, पुढच्या ४ वर्षांतच १२ पत्रकार मारले गेले. या मारल्या गेलेल्या पत्रकारांमध्ये दुर्गम भागातील कसलेच संरक्षण नसलेले स्थानिक पत्रकारच नाहीत. तर जातीयवादाविरोधात लिहिणारे किंवा भ्रष्टाचार उघडकीस आणणारे मोठमोठ्या वृत्तसंस्थामधील पत्रकार देखील बळी पडले. यावरून आपल्या व्यवस्थेमध्ये पत्रकारांची हत्या सर्वसामान्य बाब होत आहे, असेही या अहवालातून स्पष्ट होत आहे. Journalism या कमिटीचा एक विशेष अहवाल हे देखील दाखवतो की, मारले गेलेले बरेचसे पत्रकार छोट्या शहरातील होते. मोठ्या शहरात व मोठ्या संस्थेत काम करणा-या सहका-यांपेक्षा त्यांच्या जीवाला अधिक धोका होता. त्या सहका-यांपैकी निम्मे तर नियमितपणे भ्रष्टाचारावर लिहीत होते.
 
 
Journalism थोडक्यात, मीडियातील सहका-यांमध्ये आपसात ऐक्यभाव नसणे ही देखील बाब त्यांचे धोके वाढवत आहे. यातील बहुसंख्य पत्रकारांना मारायच्या आधी धमक्या देण्यात आल्या होत्या. मारल्या गेलेल्या पत्रकारांपैकी एकतृतीयांश पत्रकारांना आधी बंदी करण्यात आले होते आणि त्यापैकी बहुसंख्यांचा छळ करण्यात आला होता, असेही हा अहवाल सांगतो. Journalism हा छळ म्हणजे त्यांच्या सहका-यांसाठी थरकाप उडवणारा संदेशच होता. पत्रकारांच्या मृत्यूला कारणीभूत असणारे आणि त्यांच्याविरोधात हिंसाचार पसरविणारे खुनी आणि हल्लेखोर यांना कोणतीही शिक्षा होताना दिसत नाही, ही सर्वांत धक्कादायक गोष्ट आहे. गेल्या दशकात जगभरात जवळजवळ ३२४ पत्रकारांचे खून झाले आणि यातील ८५ टक्के प्रकरणांतील गुन्हेगारांना शिक्षा झालेल्या नाहीत. Journalism ज्यांना हिंसाचाराद्वारे प्रसिद्धी माध्यमांवर बंधने आणि नियंत्रण आणावयाची आहेत, त्यांना जणू उत्तेजित करण्यासाठीच हा संदेश आहे, असे सीपीजेच्या अहवालात नोंदवले आहे. २०१८ च्या सूचीत कायमचे शिक्षामुक्त देश म्हणून १४ देश नोंद झाली आहे. Journalism या १४ देशांत मागील दशकभरात झालेल्या पत्रकारांच्या खुनांतील ८२ टक्के खटल्यात कोणताही निर्णय झालेला नाही.
 
 
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली २०० वर्षांची भारतीय पत्रकारिता संपूर्ण जगभर आपला आब राखून आहे, पण तिला सर्वांत जास्त अधिकार, सर्वांत जास्त स्वातंत्र्य केवळ लोकशाही व्यवस्थेतच आहेत. Journalism लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या राज्यात सत्तेत असणारे लोक आणि त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवणारे लोक यांच्या मधला दुवा असणारी पत्रकारिता ‘पारदर्शकता' या एकमेव कसोटीवर खरी उतरायला हवी. काळानुरूप झालेल्या बदलांनुसार तिची रूपेही बदलली असली तरी शासन आणि सामान्य नागरिक यातील माध्यम म्हणून असलेली भूमिका तशीच आहे. Journalism जिथे पत्रकारितेचा विषय येतो तिथे नागरिकांना जागृत करण्याची, त्यांच्या हक्कांसाठी आपल्या व्यवसायाचा विधायक वापर सामान्य लोकांसाठी करणे ही माध्यमांची जबाबदारी अधोरेखित होते. Journalism खरं तर कोणत्याही देशाचे कौशल्य, सामर्थ्य व तरुण पिढीला दिशा देण्याचे काम करणारा हा चौथा स्तंभ सर्वार्थाने जगण्याची, जगवण्याची गरज आहे.
Powered By Sangraha 9.0