वीज कर्मचार्‍यांचा 72 तासांचा संप

04 Jan 2023 16:29:11
अकोला,
electricity workers समांतर वीज वितरण परवान्याला विरोध दर्शवित महावितरणच्या कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समितीद्वारे राज्यव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपात अकोला परिमंडळातील अर्थात अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. मंगळवार, 3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून 72 तास संप राहणार आहे. या काळात सुरळीत वीज पुरवठ्याची खबरदारी घेतली असली तरी, ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अकोला परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. वीज कर्मचार्‍यांच्या संपात महावितरण,महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील एकूण 29 संघटनांचे कर्मचारी, अभियंते व अधिकारी सहभागी आहेत. अकोला, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बाह्यस्त्रोत कर्मचार्‍यांच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व माहिती देण्यासाठी विभागीय स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
 
 
VTFGH
 
संप कालावधीत वीज पुरवठा खंडित झाल्यास पूर्ववत होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी सहकार्य करावे. कर्मचारी, अभियंते व अधिकारी संपावर असल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये, तक्रार दाखल करता यावी तसेच वीज वाहिनी तुटणे, शॉर्ट सर्किट होणे आदीबाबत माहीती देण्यासाठी 24 तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात आले आहे. electricity workers हकांनी 7875763485 आणि वाशीम जिल्ह्यातील ग्राहकांनी 7875763276 या नंबरवर माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन अकोला परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. संपकाळात वीज पुरवठ्याशी संबंधित सर्व खबरदारी घेतल्या गेली आहे. मात्र, वीज पुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्याकरिता थोडा कालावधी लागू शकतो. त्यादृष्टीने रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवेतील विविध विभागांनी पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
Powered By Sangraha 9.0