आशिया चषक क्रिकेट स्पर्धा सप्टेंबरमध्ये, परंतु स्थळ, वेळापत्रकाचा पत्ताच नाही

05 Jan 2023 18:40:19
नवी दिल्ली,
यावर्षी Asia Cup आशिया चषक वन-डे क्रिकेट स्पर्धा सप्टेंबर महिन्यात आयोजित केली जाईल, अशी घोषणा आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) गुरुवारी केली, परंतु यजमान देश अर्थात स्पर्धेचे स्थळ व वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही. पाकिस्तान या वर्षीच्या आशिया चषकाचे मूळ यजमान आहे, परंतु दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे बीसीसीआय पाकिस्तानमध्ये खेळण्यास उत्सुक नाही. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) तत्कालीन अध्यक्ष रमीझ राजा यांनी बीसीसीआयच्या भूमिकेला विरोध केला होता आणि भारतात होणार्‍या वन-डे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकीही दिली होती. परंतु पीसीबीमध्ये बदल झाल्यानंतर राजा यांच्या जागी अध्यक्ष म्हणून नजम सेठी यांची नियुक्ती करण्यात आल्याने काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात.
 
 
Asia Cup
 
Asia Cup आशिया चषक 2023 वन-डे क्रिकेट स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि एक पात्रता संघ अशा एकूण सहा संघांचा सहभाग असेल. संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या गत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला नमवून विजेतेपदाचा मान मिळविला होता. ऑस्ट्रेलियात आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असल्यामुळे ही स्पर्धा टी-20 कि‘केटच्या स्वरुपात खेळली गेली. भारत या वर्षाच्या अखेर वन-डे कदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे आणि सर्व सहभागी संघांचे लक्ष 50 षटकांच्या क्रिकेट स्वरुपावर असल्याने, यंदाचा आशिया चषक 50 षटकांच्या क्रिकेट स्वरुपात होणार आहे.
 
 
यावेळी बीसीसीआयचे सचिव व एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी पुढील दोन वर्षांसाठी क्रिकेट स्पर्धा कार्यक्रम जाहीर केला. क्रिकेट या खेळाला एका नवीन उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. क्रिकेट साठी ही योग्य वेळ आहे. सर्व आशियाई देशांतील क्रिकेटपटू नेत्रदीपक कामगिरीसाठी सज्ज झाले आहेत, असे जय शाह म्हणाले. एसीसीने घोषित केलेल्या दोन वर्षांच्या चक्रात (2023-2024 दरम्यान) एकूण 145 वन-डे व टी-20 सामने खेळले जातील. 2023 मध्ये 75 सामने व 2024 मध्ये 70 सामने होतील. तसेच, इमर्जिंग 23 वर्षांखालील Asia Cup आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरु होत आहे. या वर्षी जुलैमध्ये ही पुरुषांची 50 षटकांच्या स्वरूपात स्पर्धा आयोजित केली जाणार असून त्यात आठ संघांचा समावेश असेल. पुढील वर्षी डिसेंबरमध्ये ही स्पर्धा टी-20 स्वरुपात होणार आहे. या वर्षी जूनमध्ये होणारा महिलांची इमर्जिंग आशिया चषकही टी-20 क्रिकेट च्या स्व हा आठ संघांचा समावेश असलेला टी- सामना असेल.
Powered By Sangraha 9.0