बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पुरस्कारांचे वितरण

05 Jan 2023 19:44:52
वर्धा, 
वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने (Balshastri Jambhekar) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी 6 रोजी मराठी पत्रकारदिन व चौथा स्तंभ, पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. दादाजी धुनिवाले देवस्थान सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित या कार्यक्रमात शेतकर्‍यांचे आधारस्तंभ ठरलेले रवींद्र वैद्य (बेलघाट) यांना चौथा स्तंभ सामाजिक पुरस्कार तर ग्रामीण विभागातून पत्रकारिता पुरस्कार पत्रकार विजय राठी (हिंगणघाट) आणि गजानन गारघाटे (गिरड) यांना तर शहरी विभागातून पत्रकारिता पुरस्कार (Balshastri Jambhekar) पत्रकार इक्राम हुसेन शेख (वर्धा) आणि महेश मुंजेवार (वर्धा) यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
 
Balshastri Jambhekar
 
अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस राहणार असून तर उद्घाटक म्हणून आ. डॉ. पंकज भोयर राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता मेघे उच्चशिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, सुनील बुरांडे यांची उपस्थिती राहील.
Powered By Sangraha 9.0