विवेकानंद जन्मोत्सवाची विवेकानंद आश्रम येथे जय्यत तयारी

05 Jan 2023 20:47:17
हिवरा आश्रम,
जिल्हयातील विवेकानंद आश्रम Vivekananda Ashram हा सेवा व ज्ञान प्रकल्पांसाठी सर्वदूर पर्यंत प्रसिध्द आहे. निष्काम शुकदास महाराजांनी विवेकानंद विचारांना केवळ सिध्दांतिक व वैचारीक मर्यादेत न ठेवता त्यांना क्रीयाशिलतेच्या व मानवकल्याणाच्या व्यवहारीक पातळीवर अमलात आणले आहे. स्वामी विवेकानंद हे मानवता धर्माचे प्रतिक म्हणून जगातील सर्व तत्वज्ञ, विचारवंत, वैज्ञानिक, संशोधक व युवकांचे प्रेरणास्थान राहीले आहेत. त्यांची जयंती अत्यंत भव्य प्रमाणात विवेकानंद आश्रमात संपन्न होत असते.
 
Vivekananda Ashram
 
मराठी तिथीनुसार पौष वद्य सप्तमी हा Vivekananda Ashram स्वामीजींचा जयंतीदिन आहे. यावर्षी 12, 13, 14 जानेवारी ला या जयंती उत्सवाचे आयोजन आश्रमात केले आहे. तीनही दिवस राज्यभरातील विचारवंतांचे व्याख्यान, प्रवचन, किर्तन हे प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न होतील. दोन लाख भाविकांना एका वेळेला पंगतींमधून दिल्या गेलेला महाप्रसाद हा केवळ स्वयंशिस्तीतूनच शक्य होतो. या उत्सवात सर्वजाती धर्माचे लोक सहभागी होतात. व मानवता धर्माचे विराट प्रदर्शन त्या निमित्ताने होत असते. कोराडी धरणातील भव्य विवेकानंद स्मारक व हरिहरतीर्थावरील नयनरम्य शिवउद्यान हे आकर्षणाचे केंद्र आहेत.
 
 
शोभायात्रा व महाप्रसादातील उपस्थिती ही भाविकांसाठी श्रध्दा व भक्तीयुक्त सहभाग ठरते. या उत्सवासाठी विवेकानंद आश्रमाची तयारी युध्दपातळीवर सुरु आहे. यावर्षी सुध्दा हा Vivekananda Ashram उत्सव यशस्वीतेची नवी पायरी चढेल असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. महापंगतीत सहभागी होणारे सर्व भाविक माझे देव आहेत मी त्यांची पूजा करणार व त्यांना नैवेद्य दाखविणार हा निष्काम कर्मयोगी शुकदास महाराजांचा संदेश मानवातील देवत्वची सेवा करण्याची शिकवण देतो. उत्सवानिमित्त भव्य यात्रा सुध्दा भरते या यात्रेत मोठी आर्थिक उलाढाल होत असून व्यापारी यात्रेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. समाजातील सर्व घटकांनी या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन विवेकानंद आश्रमाच्या वतीने करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0