भाटंबा शिवारात अवैध गौण उत्खनन प्रकरणी सहायक जिल्हाधिकार्यांची धडक कारवाई
06 Jan 2023 18:14:47
- ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीचे पाच टिप्पर जप्त
पुसद,
पुसद शहरापासून 5 ते 7 किमी अंतरावर असलेल्या भाटंबा शेतशिवारात Illegal Mining अवैध गौण उत्खनन प्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकार्याने 3 जानेवारी रोजी रात्री 11 च्या दरम्यान धडक कारवाई केली. त्या कारवाईत ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीचे पाच टिप्पर जप्त केले असून दंडात्मक कारवाईची प्रकि‘या सुरू आहे. भाटंबा येथील शेत सर्वे नंबर 37, क्षेत्रफळ 3.46 हेक्टर व शेत सर्वे नंबर 41, क्षेत्रफळ 4.05 हेक्टर या शेत जमिनीवर गिट्टी क्रशर, हॉट मिक्सिंग, बॅच मिक्स प्लांट, डिझेल पंप, लेबर कॅम्प, वाहने तसेच अवैधपणे गौण खनिज उत्खनन करून ठेवलेले होते. त्याबाबत उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेय यांना माहिती मिळाली असता त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाच टिप्पर जप्त केले आहेत.
कार्तिकेय यांनी रात्रीच्या वेळेला Illegal Mining अवैधरित्या गौण उत्खनन प्रकरणी कारवाई केल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. यात विशेष बाब म्हणजे भाटंबा शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण उत्खनन सुरू असल्याची माहिती भाटंबाचे तलाठी व मंडळ अधिकारी पुसद यांना असूनदेखील त्यांनी उपविभागीय अधिकार्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. भाटंबा शिवारामध्ये हा प्रकार सुरू असल्याबाबत उपविभागीय अधिकार्यांना कळविले नसल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे. अवैधरित्या मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले असताना जबाबदार अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदार यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.