पत्रकारांचे जीवन अतिशय धावपळीचे आहे, त्यांना वेळेचे बंधन रहात नाही. जिथे घटना तिथे पत्रकारांना पोहोचावे लागते, अशा स्थितीत आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परंतु सामाजिक भान जपत असताना पत्रकारांनी स्वतःचे आरोग्यदेखील जपणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी Manisha Salve मनीषा साळवे यांनी केले. स्थानिक जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात आयोजित मराठी पत्रकार दिनाच्या सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघ संलग्नित यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार ट्रस्टच्या वतीने आयोजित पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार किशोर जुननकर तथा प्रमुख पाहुणे श्रमिकचे राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश राऊत, रघुवीरसिंह चौहान यांच्यासह यवतमाळ श्रमिक पत्रकार ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत, सचिव सुरेंद्र राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला आद्य पत्रकार ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. पुढे बोलताना Manisha Salve मनीषा साळवे म्हणाल्या, पत्रकारांना पत्रकारिता करतांना रात्रंदिवस एकसमान असतो. कुठली घटना घडली अथवा अपघात झाला त्या ठिकाणी तत्काळ आपण पोहचतो़ अशा स्थितीत आपली वेळ निश्चिती नसते़ वेळी, अवेळी दिनचर्येतील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होतो़, त्यामुळे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांनी आरोग्याची देखील काळजी घेण्याचा संकल्प करावा जेणेकरून आपण समाजासाठी जी पत्रकारिता करत आहो, ती अधिक उत्तमपणे करू, असे संबोधित केले़
त्यानंतर कार्यक‘मात अध्यक्ष किशोर जुननकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. यवतमाळ श्रमिक पत्रकार ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत राऊत यांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या़ तर प्रास्ताविक सुरेंद्र राऊत यांनी केले. या कार्यक‘माचे संचालन रूपेश उत्तरवार यांनी केले, तर आभार घनश्याम वाढई यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गणेश बयस, अनिरुद्ध पांडे, नागेश गोरख, लक्ष्मणलाल खत्री, लक्ष्मीकांत भागवत, विजय बुंदेला, वीरेंद्र चौबे, किरण कोरडे, उदय नावडे, मयूर वानखडे, सुकांत वंजारी, मनीष जामदळ, समीर मगरे, जयंत राठोड, चेतन देशमुख, दीपक शास्त्री, शाकीर अहमद, अंकुश वाकडे, सतीश बाळबुधे, वासू आहुजा, ज्ञानेश्वर ठवकर, ओंकार चेके, डॉ. गणवीर, अशोक गोडंबे, अभय पापळकर, सचिन झिटे यांच्यासह माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.