आत्मानंद सरस्वती रामचंद्र महाराज स्मरणोत्सव

    दिनांक :08-Jan-2023
Total Views |
नागपूर,
दरवर्षी प्रमाणे यावर्षी यंदासुद्धा श्री आत्मानंद सरस्वती रामचंद्र महाराज Maharaj स्मरणोत्सवाच्या निमित्याने दक्षिण नागपुरातील शिर्डी नगर, मानेवाडा रोड येथे ७ ते १५ जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्य दररोज सकाळी ६ ते ७ काकडा भजन, सकाळी ९ ते १२ श्री ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते ४ महिला मंडळांचे भजन, सायंकाळी ५.३० ते ६.३० हरिपाठ व रात्री ७ ते ९ या वेळेत हरि कीर्तन आयोजित करण्यात आलेले आहे .
 
 
maha
 
सदर हरिनाम संकीर्तन सप्ताहाची सांगता १४ जानेवारी रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत गोपाळकाल्याच्या कीर्तनाने होईल व त्यानंतर श्रींची भव्य पालखी मिरवणूक निघेल. सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. Maharaj हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे नियोजन ह.भ.प. माधवराव चावके महाराज , ह.भ.प. प्रमोद हिवरे महाराज, ह.भ.प. प्रभाकर गोतमारे , ह.भ.प. मनोहर तिडके महाराज , ह.भ.प. जजवलग कोहळे तसेच संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज फुके व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे.
 
(सौजन्य संपर्क मित्र संदीप कोहळे)