संस्कृत भारती संचालित बाल संस्कार केंद्राचे उदघाटन

08 Jan 2023 19:08:21
नागपूर,
संस्कृत भारती (Sanskrit Bharati) नागपूर महानगर व पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या सहकार्याने प्रत्येक रविवारी दुपारी ४ ते ५ वाजता रामनगर राममंदिरात संचालित बाल संस्कार केंद्राचा शुभारंभ प्रा. संभाजी पाटील, महानगर मंत्री, संस्कृतभारती, नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले.
 
Sanskrit Bharati
 
कार्यक्रमाचे अध्यक्षपद रवि वाघमारे, पश्चिम नागपूर नागरिक संघ यांनी भूषविले. ह्या बालकेंद्राच्या संचालिका जया काळे आहेत. हा वर्ग दर रविवारी सायंकाळी चार ते पाच राम मंदिर रामनगर येथे होणार आहे. इच्छुक पाल्य आणि पालकांनी जया काळे यांच्याशी संपर्क साधावा. आजच्या (Sanskrit Bharati) कार्यक्रमाला बालगोपाल व संस्कृत प्रेमी पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन विद्या आळशी यांनी केले. सरस्वती वंदना अमेय वैद्य यांनी गायिली. पाहुण्यांचा परिचय स्वाती सुळे यांनी करून दिला.
 
 
- सौजन्य : संपर्क मित्र रवि वाघमारे
 
Powered By Sangraha 9.0