‘सक्षम’द्वारे दिव्यांगांसाठी ‘नागपूर मॅरेथॉन 2023’ चे यशस्वी आयोजन
08 Jan 2023 18:16:17
नागपूर,
8 जानेवारी 2023 रोजी झालेल्या (Nagpur Marathon 2023) ‘नागपूर मॅरेथॉन 2023’ मध्ये सक्षम (समदृष्टी क्षमता विकास व अनुसंधान मंडल) नागपूर मार्फत 187 दिव्यांगजनांनी भाग घेतला. ही स्पर्धा लायन्स क्लब, अॅडव्हेन्चर अॅण्ड यू यांच्याद्वारे आयोजित करण्यात आली होती व दालमिया सिमेंट हे मुख्य प्रायोजक होते. दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येते. यंदा या स्पर्धेत भाग घेतलेल्या 187 दिव्यांग स्पर्धकांमध्ये 139 मुले व 48 मुली सहभागी झाल्या होत्या. श्रवणबाधित, दृष्टीबाधित, अस्थिव्यंग, मतिमंद तसेच डॅर्फ्स या प्रकारच्या दिव्यांगांचा यामध्ये समावेश होता. डॅर्फ्स लोकांनी पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला हे या (Nagpur Marathon 2023) स्पर्धेचे वैशिष्ट होते.
या (Nagpur Marathon 2023) स्पर्धेसाठी मूकबधीर निवासी शाळा सावनेर, मुकबधीर विद्यालय शंकर नगर, कल्याण मुकबधीर विद्यालय रेशीमबाग, ज्ञानज्योती निवासी अंध विद्यालय नागलवाडी, बीआरए अंध विद्यालय साउथ अंबाझरी मार्ग, स्वीकार संस्था, दिव्यांग विकास आघाडी (भाजप), आशादीप संस्था, सर गंगाधरराव चीटणवीस मेमोरियल ट्रस्ट या संस्थांनी दिव्यांग जनांचा सहभाग नोंदविला होता. सुंदर आयोजन व सहभागी दिव्यांग जनांचा ओसंडून वाहणारा उत्साह ही या स्पर्ध्येची वैशिष्टे होती. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सक्षमच्या अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. आयोजकांनी सर्व संबंधितांचे आभार व्यक्त केले आहेत.