व्यसनमुक्त समाज घडविण्यात बाबा जुमदेव यांचे मोलाचे योगदान : बोपचे

    दिनांक :09-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
तिरोडा, 
Baba Jumdev : अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्त समाज घडविण्याची आणि सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे परमपूज्य त्यागी बाबा जुमदेव यांनी दुःखी, व्यसनाधीन व गरीब माणसांसाठी परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली. परमात्मा एक सेवक मंडळात अनेक जाती धर्माचे लोक असून त्यांनी मानव धर्माची एक नवीन संस्कृती निर्माण केली. व्यसनमुक्त समाज घडविण्यात महान त्यागी बाबा जुमदेवजी (Baba Jumdev) यांचे कार्य मोलाचे आहे, असे प्रतिपादन युवा नेते रविकांत बोपचे यांनी केले.
 
Baba Jumdev
 
तालुक्यातील सुकळी येथे परमात्मा एक सेवक मंडळ नागपुरच्या वतीने आयोजित सेवक संमेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाला राजु मदनकर, मनोहर देशमुख, मोरेश्वर गभने, टिकाराम भेंडारकर, संजय महाकाळकर, डॉ. तेजराम रहांगडाले, जिप सदस्य जगदीश बावनथडे, माजी जिप सदस्य रमेश अंबुले, पंस सदस्य विजय बिंझाडे, जयप्रकाश पटले, माजी सरपंच चेतना बावनथडे, सरपंच सुनिल मेश्राम तसेच परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक, सेविका हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.