आमगाव,
Amgaon police स्थानिक पोलिस ठाण्यात बसविण्यात आलेल्या विघ्नहर्ता गणरायाच्या दहा दिवस भक्तीभावाने पुजन करुन अनंत चतुर्दशीला वाजतगाजत निरोप देण्यात आला. सण, उत्सव शांततेत व सुरळीत पार पडावे, यासाठी चोवीस तास कर्तव्य बजावणार्या आमगाव पोलिसांनी पोलिस ठाण्यात गणेशमूर्तीची स्थापना केली होती.

दहा दिवस श्रद्धापूर्वक पुजाअर्चना केल्यावर अनंत चतुर्दशीला मूर्तीचे विर्सजन करण्यात आले. तत्पूर्वी पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनात बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. Amgaon police रॅली पोलिस निरीक्षक युवराज हांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणपत धायगुडे, उपनिरीक्षक अशोक खेडकर, उपनिरीक्षक अक्षय वळसे पाटील, उपनिरीक्षक दिपाली साळुंखे, सत्यशीला छिपे, सुरेंद्र लांजेवार, होरीलाल रहांगडाले, राजू गजपुरे, पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गणपती बाप्पाचा जयजयकार करीत पुढच्या वर्षी लवकर येण्याची गळ घालत ढोल ताशाच्या गजरात ही रॅली शहरातील मुख्य मार्गांनी जगनाडे चौक, मानकर चौक, गांधी चौक, नटराज मार्गाने काढून तुकडोजी चौक येथील माताबोडी तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.