समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी लक्झरी बसला आग

01 Oct 2023 19:09:07
मेहकर, 
Samriddhi highway धावत्या खाजगी लक्झरी बस ला आग लागल्याची घटना दि. 30 सप्टेंबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉर वरील शहरापासून जवळ असलेल्या चॅनल 280 वरील पिंपरी माळी गावाजवळ घडली. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. सिंध ट्रॅव्हल्स ची ही बस अमरावती हून पुणे जात होती.
 
 
Samriddhi highway
 
दरम्यान रात्री गाडीतील एसी मध्ये बिघाडहून शॉर्ट सर्किट मुळे बस ला आग लागली. Samriddhi highway बस मध्ये 30 प्रवाशी व दोन चालक होते. प्रसंगावधान राखून चालकाने तात्काळ प्रवाशांना बस मधून बाहेर काढल्याने कुठलीही जीवित हानी नाही.
Powered By Sangraha 9.0