वन अधिकाऱ्यांनी उत्तम काम नावलौकिक वाढवावा

10 Oct 2023 21:49:48
नागपूर, 
Shailesh Temburnikar : राज्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना क्षेत्रीय स्तरावर भेडसावणाऱ्या विविध अडचणी आणि समस्या बाबत चर्चा करण्यासाठी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन बल प्रमुख) शैलेश टेंभुर्णीकर (Shailesh Temburnikar) आणि फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्यात वनभवन, नागपूर येथे सभा पार पडली. यावेळी फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि राज्यातील सर्व ११ वनवृत्तातील पदाधिकारी उपस्थित होते.
 
Shailesh Temburnikar
 
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शैलेश टेंभुर्णीकर (Shailesh Temburnikar) यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अतिशय चांगले काम करत असून त्यांच्या चांगल्या कामाच्या पाठीमागे मी व्यक्तिशः खंबीरपणे उभे असल्याचे सूतोवाच केले. राज्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी हे अधिक सकारात्मकतेने काम करत असून त्यांच्या कामामुळे राज्याचा वनविभाग देशात प्रगतीपथावर आहे. राज्यातील सर्वच अधिकाऱ्यांनी कल्पकतेने आणि सर्जनशीलतेने काम करून वनविभागाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा वाढवावी असे मत यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले.
 
 
यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष निलेश गावंडे, सरचिटणीस मंगेश ताटे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना क्षेत्रीय स्तरावर असलेल्या विविध अडीअडचणी विस्तृतपणे मांडल्या. याव्यतिरिक्त वनबल प्रमुखांनी विविध अडचणी जाणून घेऊन याबाबत शासनाच्या वतीने सकारात्मक पावले टाकले जातील असे आश्वासन उपस्थितांना दिले. याप्रसंगी संघटनेचे सल्लागार किशोर मिश्रीकोटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ, निलेश सोनवणे, उमेश वाघ, गणेश टेकाळे, निलय भोगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सरचिटणीस मंगेश ताटे यांनी तर आभार श्रीकांत जाधव यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0