नागपूर,
New Narsala-Nagpur आनंदम कॉलनी, खसरा न.120, नवीन नरसाळा, नागपूर, सदर ले आऊट हा अधिकृत आहे, नागरिकांकडून डेव्हलपमेंटचे पैसे सुद्धा घेतले आहे. परंतु येथे नागरी सुविधांचा अभाव आहे. New Narsala-Nagpur कच्चे रस्ते, पोल असून लाईट नाहीत, सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. रात्री सर्वत्र अंधार असल्यामुळे समाजकंटक येथे येवून दारु, गांजा पितात.
अनेक वर्ष लोटूनसुद्धा स्थानिक प्रशासनाचे याकडे लक्ष का जात नाही? New Narsala-Nagpur काही तरी कारण सांगून नागरिकांना वेठीस धरले जाते आहे. नागरिक टॅक्स भरतात, मग सुविधा पुरविण्याची जवाबदारी कुणाची ? आ. चंद्रशेखर बावनकुळे यासाठी सतत पाठपुरावा करीत आहेत, तरीपण शासकीय अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत. New Narsala-Nagpur वेळोवेळी नागरिक लेखी, तोंडी समस्या घेवून जातात पण अधिकारी नागरिकांना समाधानकारक उत्तरे देत नाहीत.
यांच्यावर कुणाचा अंकुश नाही. New Narsala-Nagpur नुसती मनमानी होत आहे. जवाबदारी घेवून समस्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न कोण करणार? ही समस्या फक्त एका भागात नसून मनपा हद्दीत असलेल्या जवळपास सर्व ठिकाणी आहे. उपमुख्यमंत्री नागपूरचे पालकमंत्री सुद्धा आहेत. New Narsala-Nagpur त्यांनी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करावी व नेमून दिलेल्या वेळेत काम न झाल्यास कठोर कारवाई करावी. तेव्हाच अधिकारी कामाला लागतील.
सौजन्य : महेंद्र वैद्य, संपर्क मित्र