वंजारी विधी महाविद्यालयात युथ पार्लमेंटचा उत्साह

Wanjari law college-nagpur विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

    दिनांक :10-Oct-2023
Total Views |
नागपूर,
 
Wanjari law college-nagpur स्व. गोविंदराव वंजारी विधी महाविद्यालय, हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच तत्पर आहे व याचमुळे उद्या समाजात अनेक यशस्वी व्यक्ती येथून घडतील, असा विश्वास युवा वक्ते अ‍ॅड. ऋग्वेद सेनाड यांनी व्यक्त केला. Wanjari law college-nagpur महाविद्यालयात आयोजित युथ पार्लमेंटचे न्यायाधीश म्हणून ते बोलत होते. मंचावर प्राचार्य डॉ. स्नेहल फडणवीस व प्रा. मोनाली गांधी उपस्थित होत्या. Wanjari law college-nagpur सदनाचे सभापती म्हणून अ‍ॅड. सूरज काकडे उपस्थित होते. यावेळी ऋग्वेद सेनाड यांनी विजेत्यांची नावे घोषित केली. डॉ. स्नेहल फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच इतर कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करीत असल्याचे सांगितले. Wanjari law college-nagpur
 
 
Wanjari law college-nagpur
 
आजी-माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी विविध उप्रकमांचे आयोजन करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या. Wanjari law college-nagpur सूरज काकडे यांनी विद्यार्थ्यांना सादरीकरणातील त्रुटी सांगत भविष्यात उत्तम कामगिरी करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रा. वैशाली शिवणकर, प्रा. अरुणा कडू यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वश्रेष्ठ सत्तापक्ष नेता म्हणून नुपूर मते तर सर्वश्रेष्ठ विरोधी पक्ष नेता म्हणून अंशुमन पावनकर यांनी बाजी मारली. किशोरी राणे, गौरव वर्‍हाडे व गौरव चिखलकर यांनीही पारितोषिके पटकाविली. Wanjari law college-nagpur सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवम हजारे, सेजल शेंद्रे, प्रांजली काळे, हेमंत सरकार, आर्यन पिल्लारे, सुमित पांडे आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
 
सौजन्य : अ‍ॅड.मधुरा सेनाड, संपर्क मित्र