वाशीम,
Bhavna Gawli : आकांक्षित असलेल्या वाशीम जिल्ह्यातील सहाही तालुयाचा पोखरा योजनेत समावेश करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र देवून प्रस्ताव मागविले़ यासाठी खा़ भावना गवळी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने जिल्ह्याचा पोखरा योजने समावेश होण्याची अपेक्षा उंचावली आहे़
या संदर्भात खा़ भावना गवळी (Bhavna Gawli) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात नमुद केले की, वाशीम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून, मागील काही वर्षांपासून निसर्गाचा समतोल बिघडल्याने संपुर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेला शेती व्यव्यवसाय अडचणीत आला़ अशात यावर्षी उशिरा दाखल झालेला मान्सून व वेळीअवेळी झालेल्या पावसामुळे खरिप हंगाम हातचा गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे़ निसर्गाच्या अवकृपेमुळे सातत्याने दुष्काळात होरपळत असलेल्या वाशीम जिल्ह्यातील काही तालुयाचा पोखरा योजने समावेश करण्यात आला़ परंतू शेतकर्यांची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सहाही तालुयाचा शासनाच्या महत्वाकांक्षी पोखरा योजनेत समावेश करण्याची आग्रही मागणी केली़ यासाठी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, मुख्यमंत्र्यांनी वाशीमच्या जिल्हाधिकार्यांना पत्र देवून प्रस्ताव मागविला आहे़ त्यामुळे लवकरच जिल्हाचा या योजनेत समावेश होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.