इस्रायलच्या रणचंडीने मारले हमासचे 24 अतिरेकी

-इनबार लिबरमॅनचे जगभरात कौतुक

    दिनांक :11-Oct-2023
Total Views |
तेल अविव, 
Israel Inbar Lieberman : हमासच्या अतिरेक्यांनी मागील शनिवारी इस्रायलमध्ये घुसून हजारपेक्षा जास्त नागरिकांची हत्या केली. मात्र, इस्रायली सैन्यातील 25 वर्षीय इनबार लिबरमॅन नावाच्या रणचंडीसमोर त्यांचा निभाव लागला नाही. तिने काही जणांची मदत घेत केवळ आपल्या समुदायाला हल्ल्यापासून वाचवले नाही तर, हमासच्या 24 पेक्षा जास्त अतिरेक्यांना यमसदनी पाठवले. आता जगभरात तिच्या पराक्रमाची चर्चा आणि कौतुक होत आहे.
 
Israel Inbar Lieberman
 
इनबार लिबरमॅन (Israel Inbar Lieberman) गाझापट्टीपासून काही किमी अंतरावर असलेल्या किबुत्झ समुदाय नीर एमची सुरक्षा समन्वयक आहे. हमासच्या अतिरेक्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यांवेळी लिबरमॅनने स्फोटांचा आवाज ऐकला. तिने लगेच 12 जणांच्या सुरक्षा पथकासह मोर्चा सांभाळला. तिने आपल्या सहकार्‍यांना मोक्याच्या ठिकाणी तैनात केले. हमासच्या दहशतवाद्यांनी किबुत्झ नीर एमवर केलेल्या हल्ल्याल लिबरमॅन आणि तिच्या पथकाने चार तास प्रत्युत्तर देत 24 पेक्षा जास्त अतिरेक्यांचा खात्मा केला.
 
 
नीर एमच्या आजुबाजच्या किबुत्झमध्ये दहशतवाद्यांनी नरसंहार करीत शेकडो जणांची हत्या केली. मात्र, नीर एममध्ये ते काहीच करू शकले नाहीत. (Israel Inbar Lieberman) इस्रायलच्या समाज माध्यमांवर इनबारच्या पराक्रमाचे कौतुक केले जात आहे. इस्रायल सरकारने तिच्या पराक‘माची दखल घेत तिला सन्मान द्यावा, अशी मागणी केली जात आहे.