ज्येष्ठ व्यक्ती कुटुंबाचा आधारवड : आमदार कुणावार

11 Oct 2023 20:09:33
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
MLA Kunawar : ज्येष्ठ व्यक्ती कुटुंबाचा आधारवड असतो. परंतु, अलीकडच्या काळात प्रामुख्याने विभक्त कुटुंबात ज्येष्ठ व्यक्ती व वृद्धांची उपेक्षा होत आहे. ही निश्‍चितच चिंताजनक बाब आहे, अशी खंत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केली. स्थानिक संत गोमाजी वार्ड येथील अब्दुल्ला नगरात आयोजित 50 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करताना ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, माजी नगराध्यक्ष गिरधर राठी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे, गिमाटेक्सचे व्यवस्थापक शाकिरखान पठाण, माजी नगरसेवक पद्मा कोडापे, प्रा. बालाजी राजूरकर यांची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नागरिक डॉ. उषा साजापूरकर, रामभाऊ गायकवाड, गिरीधर वणीकर, सुभाष बाळापुरे, लक्ष्मण वांढरे, संजय कुमार, नाना गंधारे गुरुजी, शे. मा. महाबुद्धे यांना सन्मानित करण्यात आले.
 
MLA Kunawar
 
आमदार कुणावार MLA Kunawar पुढे म्हणाले की, शासनाकडून प्राप्त 50 कोटींच्या विकास निधीमुळे विविध प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामांना तत्काळ सुरुवात होणार असून शहराकरिता ही ऐतिहासिक तसेच गौरवाची बाब असल्याचे ते म्हणाले. भाजपा उपाध्यक्ष किशोर दिघे 50 कोटींच्या निधीमुळे शहरात विकासाची गंगा वाहणार असून शहरातील विविध रस्ते व नाल्यांच्या समस्या मार्गी लागणार असल्याचा त्यांनी विश्‍वास व्यक्त केला.
 
 
प्रास्ताविक अंकुश ठाकूर यांनी केले. संचालन वैशाली वणीकर यांनी केले तर आभार भाजपा जिल्हा सचिव प्रा. किरण वैद्य यांनी मानले. MLA Kunawar कार्यक्रमाला संजय नासिरकर, मंगेश वणीकर, बिरादर, पुरुषोत्तम पराते, विरेंद्र बोरकर, डॉ. संदीप मुडे, श्याम भीमनवार, संदीप डेहणे, सुभाष कुंटेवार, मंदार मराठे, हरीश जेस्वाणी, शंकर मुंजेवार, राकेश शर्मा, श्रद्धा कुणावार, डॉ. कीर्ती दिघे, शिल्पा बोरकर, अनिता माळवे, रवीला आखाडे, शुभांगी वैद्य, नलिनी सयाम, शमीन झाकरिया आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0