शंकरबाबा पापळकर यांना जैताई मातृगौरव पुरस्कार

    दिनांक :11-Oct-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
Shankar Baba Papalkar : जैताई देवस्थानतर्फे आतापर्यंत बारा समाजसेवा समर्पित भगिनींना जैताई मातृगौरव हा प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वर्षी पुरस्काराच्या तपपूर्ती निमित्त देवस्थानने वझ्झर येथील 123 बेवारस दिव्यांग मुलांचे मातृपितृत्व स्वीकारलेल्या शंकरबाबा पापळकर यांंची या पुरस्कारासाठी सर्वानुमते निवड केल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार व सचिव मुन्नालाल तुगनायत यांनी दिली.

Shankar Baba Papalkar 
 
या वर्षी विशेष स्वरूपात (Shankar Baba Papalkar) शंकरबाबांच्या दहावी नापास शंकर धोबी ते डॉ. शंकरबाबा पापळकर या भारावून टाकणार्‍या जीवनप्रवासाला मानवंदना देण्यासाठी गुरुवार, 19 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता जैताई मंदिरात पुरस्कारादाखल एक लक्ष रुपये, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे. संत गाडगेबाबांचा सहवास व प्रसाद स्वरूपात त्यांची घोंगडी लाभलेल्या व त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करत असलेल्या शंकरबाबांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने डीलिट् पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे.
 
 
83 वर्षीय (Shankar Baba Papalkar) शंकरबाबांना हा पुरस्कार 91 वर्षीय ज्येष्ठ समाजसेवक सुधाकर पुराणिक यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार ते स्वतः न स्वीकारता त्यांची लता मंगेशकर गायन पुरस्कारप्राप्त अंध मानसकन्या गांधारी हिच्या हस्ते स्वीकारणार आहेत. कार्यक‘माला प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य गजानन कासावार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक‘माला जास्तीत जास्त सं‘येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.