मानोरा,
Shankar Gaikar हिंदुस्थानामध्ये मागील काही वर्षांपासून जाणीवपूर्वक अनाचाराला काही घटकांकडून थारा देण्यात येत आहे. सहिष्णू असलेल्या आणि तुम्ही जगा व इतरांना जगू द्या हे पूर्वपार धोरण ठेवलेल्या हिंदूंच्या उदारमतवादी जीवन शैलीचा गैरफायदा परधर्मीय घेत असून धर्मांतरासारखे पाप या पवित्र धरतीवर केली जात आहेत. राष्ट्राला जागृत करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन विहिंप चे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी आपल्या अमोघ वाणीतून उपस्थितांना संबोधित केले.
तालुयातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे ९ ऑटोबर रोजी सायंकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचा समारोप जाहीर सभेद्वारा करण्यात आला. सकल हिंदूचे दैवत छत्रपती शिवराय यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष झाल्याच्या निमित्याने आणि विश्व हिंदू परिषद षष्ठीपुर्ती वर्षा निमित्य बजरंग दल विदर्भ प्रांताद्वारे ही शौर्य जागरण यात्रा आयोजीत करण्यात आली होती. शौर्य जागरण यात्रेचे मानोरा शहरामध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी प्रचंड जल्लोषात स्वागत केले. Shankar Gaikar छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन शौर्य जागरण यात्रेदरम्यान मान्यवरांकडून करण्यात आले. तत्पूर्वी शहरामध्ये रॅली सुद्धा काढण्यात आली. विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष राम हेडा, बजरंग दल तालुका प्रमुख सौरभ राठोड, विहिंप धर्म प्रचार प्रसार जिल्हा प्रमुख अरविंद इंगोले पाटील, सेवा प्रमुख विहिंप प्रणव मोहोरकर, गोसेवा प्रमुख श्याम डोळस, करण गौर धर्मप्रचार प्रसार प्रमुख विहीप मानोरा आणि इतरांनी मागील एक आठवड्यांपासून शौर्य जागरण यात्रा यशस्वी होण्यासाठी शहर आणि तालुयातील ग्रामीण भाग पिंजून काढला होता.
पुढे बोलतांना गायकर म्हणाले की, लव्ह जिहाद, लॅड जिहाद सारखे हातखंडे वापरून हिंदू धर्मावर घाला घालण्याचा प्रकार चालविल्या जात आहेत. अशावेळी परदेशातून आलेल्या अन्यायी अत्याचारी व क्रूर आक्रमणकर्त्यांना परम धर्माभिमानी शिवाजी राजेंनी आपल्या तलवारीच्या व प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर जसे थोपवून हिंदवी धर्माची ज्योत तेवत ठेवली ते पराकाष्ठेचे शौर्य प्रत्येकांच्या हृदयामध्ये जागृत करण्यासाठी या यात्रेची आयोजन करण्यात आल्याचे उपस्थितांसमोर मत शंकरजींनी वृद्धीत केले. भक्तीधाम येथील समारोपप्रसंगी व्यासपीठावर धर्मगुरु बाबूसिंग महाराज, नेहरू महाराज, जितेंद्र महाराज,गजानन माऊली पुसद, सुधीरजी भागेवार, संजय रोहनकर, अभिलेख खडगे, हरीओम पांडे, डॉ.अमित चव्हाण, सतीश हिवरकर, डॉ.ललित हेडा, गणेश ढगे, गजानन हिवरकर, सरपंच गणेश जाधव, अभिषेक चव्हाण आदीसह मानोरा शहर आणि तालुयातील युवक व नागरिक उपस्थित होते.