नागपूर,
3D Selfie Booths : मध्य रेल्वेने झोनमधील 10 प्रमुख रेल्वे स्थानकांवर 3 डी सेल्फी बूथ तयार केले आहे. यात प्रामुख्याने नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानक आणि बैतुलच्या स्थानकाचा समावेश आहे. भारताने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे नागपूर स्थानकावरील सेल्फी बूथवर दाखविण्यात आले आहे. प्रवासादरम्यान रेल्वे स्थानकावर थांबून सेल्फी बूथवर एखादा फोटो काढता यावा, यासाठी मध्य रेल्वेने ही अभिनव संकल्पना मांडली आहे. यास प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे.
सेल्फी बूथ आता आकर्षणाचे केंद्र
रेल्वेच्या या नाविन्यपूर्ण 3 डी सेल्फी बूथ (3D Selfie Booths) आता आकर्षणाचे केंद्र झाले आहे. नागपूर स्थानकावर डिजिटल इंडिया, हम है डिजिटल, हम हैं नया भारत तर बैतूल रेल्वेस्थानकावर स्वच्छता एक कदम स्वच्छता की ओर, असे घोषवाक्य ठळक अक्षरात सेल्फी बूथवर तयार करण्यात आला आहे. भारताच्या क्रीडा व अन्य क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती होत आहे, असेच यातून दाखविण्यात आले आहे. यास प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
याशिवाय मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्किल इंडिया स्किल विल झिल तर कल्याण स्थानकावर न्यू इंडिया मेडिसिन फोर्स फॉर ग्लोबल गॉड, असे ठळक अक्षरातील (3D Selfie Booths) सेल्फी बूथवर तयार करण्यात आला आहे. स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, स्पेस पॉवर आणि स्वच्छता यासारख्या विविध थीम्सचा यात समावेश करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने विविध स्थानकावर प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अनोखे सेल्फी बूथवर तयार केले आहे.