हिंगणघाट उपविभागातील सोयाबीन नुकसानीचे पंचनामे सुरू

12 Oct 2023 20:02:53
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट, 
Hinganghat soybean : तालुक्यातील सोयाबीनवर पडलेल्या पिवळा मोझॅक रोगामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाचे तसेच जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांचे आदेशानुसार ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठी यांचे मार्फत पंचमाने करणे सुरू केले आहे. वाघोली सर्कलमध्ये तहसिलदार सतिश मासाळ, नायब तहसिलदार सागर कांबळे यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन सर्वेक्षणाचा आढावा घेतला.
 
Hinganghat soybean
 
तालुक्यात सोयाबीनवर Hinganghat soybean पडलेल्या रोगाने तसेच अति पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुुकसान झाले. सोयाबीनचे सर्वेक्षण करून मोबदला देण्यात यावा अशी मागणी तालुुक्यात मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. आजनसरा येथे आयोजित कार्यक्रमात खा. रामदास तडस आणि आ. कुणावार यांनीही सोयाबीनचे सर्वेक्षण करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सर्वच मंडळातील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी यांना निर्देश दिले आहे तसेच मंडळ अधिकार्‍यांनासुद्धा त्यांच्या मंडळात भेटी देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0