धनगर जातीचा समावेश निर्णयाविरोधात निवेदन

    दिनांक :12-Oct-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
Dhangar caste आदिवासी आरक्षण हे संवैधानिक हक्क असून त्यामध्ये धनगर किंवा अन्य कोणत्याही जातीने घुसखोरी करू नये. यासाठी येथील बिरसा ब्रिगेडतर्फे येथील उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.धनगर समाजाचा आदिवासी आरक्षणात समावेश करण्यात यावा म्हणून प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जात असून ती बेकायदेशीर आहे. या धनगर व धनगड दोन्ही भिन्न जाती आहेत. त्यामुळे धनगरांना अनुसूचित जातीचे आरक्षण देता येणार नाही. असा स्पष्ट सविस्तर अहवाल महाराष्ट्र शासनाकडे दिलेला आहे. असे असतानाही धनगरांनी अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करणे चुकीचे आहे.
 

विरोध
 
 
आदिवासी संस्कृती, परंपरा, राहणीमान, जीवनशैली, भौगोलिक परिस्थिती, तसेच विशिष्ट प्रदेश वास्तव्यात असलेला व स्वतंत्र बोलीभाषा असलेला समाज आहे. आदिवासी संस्कृती ही धनगर समाजाची अजिबात मिळती-जुळती दिसत नाही. आदिवासी समाजाचे रितीरिवाज, रूढी, परंपरा, भाषा, जीवनशैली स्वतंत्र आहे. आदिवासी समाज व धनगर हे दोन वेगवेगळे समाज आहेत. आदिवासी समाजाचा व धनगर समाजाचा कुठलाही बाबतीत ताळमेळ बसत नसून आदिवासी समाजाला खर्‍या अर्थाने 7 टक्के पण आरक्षण मिळाले नाही.Dhangar caste  आधीच आदिवासी समाजात गैरआदिवासींना बोगस जात पडताळणी दाखले देत आदिवासी झालेले आहेत. खोट्या व बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर बोगस आदिवासींनी 75 हजार खर्‍या आदिवासींच्या नोकर्‍या बळकावल्या आहेत. गैर आदिवासींनी अनेक क्षेत्रात आदिवासी आरक्षणाचा गैरफायदा घेतला आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या होणार्‍या प्रगतीत अडचणी निर्माण करू नये व आरक्षणात धनगर समाजाला समावेश करू नये, अशी मागणी करण्यात आली.अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात बिरसा बि‘गेड व आदिवासी समाजातर्फे आंदोलन करण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील. या धनगर आरक्षण प्रश्नाला घेऊन बिरसा बि‘गेडच्या वतीने वणीच्या उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी बिरसा बि‘गेडचे अध्यक्ष सुधाकर चांदेकर, तालुका संघटक कवडू उईके, विजय गेडाम, प्रशांत जुमनाके, सुभाष पेंदाम, प्रवीण आत्राम, राजू गेडाम, प्रदीप गेडाम, दत्ता कुळमेथे, लक्ष्मण परचाके, निखिल खिरटकर, गोपाल हनुमंते, केशव मेश्राम, संतोष कुडमेथे, गणेश कोरचे, समीर मडावी, लहानू सालुरकर, पवन मेश्राम, मारुती कुंबरे, नथू कुंभरे, जयंत गेडाम, पांडुरंग पेंदोर, रोहित टेकाम, अर्चना किनाके, सविता कुडमेथे, प्रियंका कुडमेथे, प्रियंका कुळसंगे, शीतल मडावी, विजय केराम, हंसराज भादेकर, सुकेशना गेडाम उपस्थित होते.