सर्वोत्तम शाळेत स्वामी अवधेशानंद स्कूल

विद्यार्थ्यांना मिळणार सन्मान पत्र

    दिनांक :13-Oct-2023
Total Views |
नागपूर,
Avadheshanand School शहर व ग्रामीण भागात अस्वच्छता करीत असलेल्या नागरिकांना समज देत दंडात्मक कारवाई करण्याचे काम शाळेतील विद्यार्थ्यांनी करुन दाखविले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या उपक्रमास काही निवडक शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम प्रतिसाद दिला आहे. यात प्रामुख्याने नंदनवनच्या स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूलचा उल्लेख करावा लागणार आहे.
 

awdhesha school 
 
राज्यातील सर्वोत्तम 100 च्या शाळेच्या यादीत स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूलचा समावेश करण्यात आला आहे. सर्वोत्तम कामगिरी केलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा आता सन्मान पत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.Avadheshanand School प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी घरोघरी जावून स्वच्छता अभियानाबाबत माहिती देत काहींकडून दंड वसूल केला. तसेच कुठेही कचरा टाकणार्‍यांना समज देत कचरा पेटीतच कचरा टाकण्यास सांगितले. नागरिकांनी केलेली चुक दाखवून योग्य ठिकाणी कचरा टाकण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. याबाबत नवनवीन व्हिडीओ तयार करून सर्वत्र शेअर केले होते. या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर तसचे उदय सामंत यांनी केला होता.