-अमेरिकेतील मंदीची भीती
बंगळुरू,
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी Infosys Campus इन्फोसिसने सध्या कॅम्पस प्लेसमेंट थांबवले आहे. इन्फोसिसने यावर्षी कॅम्पस प्लेसमेंटसाठी अद्याप कोणतीही योजना आखलेली नाही. कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय यांनी सांगितले की, सप्टेंबरचे निकाल जाहीर झाल्यानंतर यावर्षी कॅम्पस प्लेसमेंटसाठी कोणतीही योजना नाही. इन्फोसिसकडे सध्या पुरेसे कर्मचारी आहेत आणि बाजारातील वातावरण लक्षात घेऊन सध्या कॅम्पस हायरिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील दुसरी सर्वांत मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसर्या तिमाहीत 6,212 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
आयटी Infosys Campus कंपन्या दरवर्षी लाखोंच्या संख्येने अभियांत्रिकी पदवीधरांची भरती करतात. भारतात दरवर्षी सुमारे 15 लाख अभियांत्रिकी पदवीधर बाहेर पडतात. यापैकी 20-25 टक्के भरती आयटी कंपन्यांकडून केली जाते, पण अमेरिकेतील मंदीच्या भीतीने कंपन्या आता नवीन लोकांना कामावर घेण्याचा विचार करत नाहीत. त्याचा परिणाम इन्फोसिसच्या निर्णयावर दिसून येत आहे. इन्फोसिसमधील कर्मचार्यांची संख्या 7,530 ने कमी झाली आहे आणि आता नियुक्त केलेले फ्रेशर्स प्रतीक्षा करीत आहेत. निलांजन यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी कंपनीने सुमारे 50 हजार फ‘ेशर्सना कामावर घेतले होते. मागणीच्या अंदाजानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, यावर्षी मंदीमुळे कॅम्पस प्लेसमेंटला वाव नाही.