Amba and Ekvira Devi विदर्भाची कुलस्वामिनी, अमरावतीची ग्रामदेवता श्री अंबा व एकविरा देवीचे यंदाचे अश्विन नवरात्र रविवार, 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. राज्यातल्या विविध भागातून येणार्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दोन्ही मंदिर संस्थाने जय्यत तयारी केली आहे. श्री अंबादेवी मंदिरात 15 ऑक्टोबरला सकाळी 5 वाजता सचिव रवींद्र कर्वे यांच्याहस्ते घटस्थापना होईल. सकाळी 8.30 वाजता सचिव अॅड. दिपक श्रीमाळी धर्मध्वजारोहण करतील. याच दिवशी सकाळी गत चार दशकांपासून संत अच्युत महाराजांनी सुरू केलेली प्रवचनमालेचे पुष्प त्यांचे शिष्य सचिन देव महाराज गुंफणार आहेत.
सोमवारी 16 ऑक्टोबरला दुपारी 12 ते 1 तपोवन बंधू भगिनीसाठी दर्शन व्यवस्था राहणार असून दुपारी 12 ते 2 या वेळात सर्व सामान्यांसाठी दर्शन बंद राहील. 23 ऑक्टोबरला सकाळी 8.30 वा. प्रवचनमालेचा समारोप होईल. त्याच दिवशी नवमीच्या होमाच्या पुजेला दुपारी 12 वा. पासून जयंत पांढरीकर व सुरेंद्र बुरंगे यांच्याहस्ते सपत्नीक सुरूवात होईल. पूर्णाहूती सायं. 7 वा. होईल. मंगळवार 24 ऑक्टोबरला दुपारी 4 वा. Amba and Ekvira Devi श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवी संयुक्तरित्या पालखीतून सीमोल्लंघनासाठी प्रस्थान करेल. संपूर्ण नवरात्र काळात दिवसभर भजने तसेच सप्तशतीपाठ या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज रात्री 11.30 वाजता मंदिर बंद होईल आणि रोज सकाळी 5.30 वा. मंदिर दर्शनासाठी उघडले जाईल. श्री एकविरा देवी मंदिरात 15 ऑक्टोबरला सकाळी 7.30 वाजता घटस्थापना होईल. सकाळी 10 वाजता ध्वजारोहण होईल. दररोज सकाळी 4 ते 6.30 अभिषेक व षोडषोपचार पुजा व श्रृंगार आरती होईल. 15 ते 22 ऑक्टोबरपर्यंत विविध भजनी मंडळांची भजने, प्रवचन व किर्तन होईल. दररोज दुपारी 11.30 वाजता नवैद्य व आरती होईल. दररोज सांयकाळी 7 वाजता विष्णूसहस्त्रनाम तथा मंत्र जागर होईल. दररोज रात्री 11.30 ते 1 महाआरती व प्रसाद वितरण होणार आहे. दोन्ही देवींचे दर्शन घेता यावे यासाठी स्त्री व पुरूष भक्तांसाठी स्वतंत्र प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे. ओटी भरणार्या स्त्रियांची संभाव्य गर्दी लक्षात घेवून ओटी घेण्याची पुरेशी व स्वतंत्र व्यवस्था आहे. भाविकांनी सहकार्य करावे असे आवहन दोन्ही संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.