कौंडण्यपूरच्या अंबिका देवीचा नवरात्र उत्सव

आजपासून विविध कार्यक्रम

    दिनांक :15-Oct-2023
Total Views |
कुर्‍हा, 
Ambika Devi of Koundanyapur विदर्भाची पंढरी आई रूक्मिणी मातेचे माहेर आणि रुख्मिणी हरण मंदिर श्री अंबिका देवी संस्थान श्री तिर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथील मंदिरामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अश्विन शारदीय नवरात्र महोत्सव तथा श्रीमद् भागवत कथा व दिपज्योत उत्सव साजरा होणार आहे.
 
 
Ambika Devi of Koundanyapur
 
महोत्सवात 15 ते 23 ऑक्टोबरपर्यंत दैनिक कार्यक्रम होणार आहे. सकाळी 6.30 ते 7 वा. देवी सहस्यनाम, सकाळी 7 ते 8 महापुजा, सकाळी 8.30 वा. आरती, सकाळी 9 ते 12 वा. दुर्गाशप्तशतीपाठ, दुपारी 12 ते 12.30 वा. धुप आरती व नैवद्य, सायंकाळी 7 ते 7.30 आरती, सायं. 8 ते 9 विष्णूसहस्यनाम व हरिपाठ, रात्री 9 नंतर दैनिक भजन होईल.15 ऑक्टोबरला सकाळी 10 वा. ज्योत प्रज्वलन होईल. श्रीमद् भागवत कथा हभप दामोधर महाराज बोबडे आणि संच सांगतील. याच दिवशी सकाळी 8 ते 9 अभिषेक पुजा, सकाळी 9.30 ते 10 वा. घटस्थापना हाईल. 16 ऑक्टोबरला सकाळी 6.30 ते 8 वा. पाद्यपूजा, रात्रीचे भजन लहानुजी महाराज भजनी मंडळ देऊरवाडा करतील. 17 ऑक्टोबरला सकाळी पाद्यपूजा व रात्रीचे भजन श्री अंबिका भजन मंडळ आर्वी करतील. 18 ऑक्टोबरला सकाळी पाद्यपूजा व रात्रीचे भजन महिला भजनी मंडळ कौंडण्यपूर करतील, 19 ऑक्टोबरला सकाळी पाद्यपूजा व रात्रीचे भजन विटलापूर भजनी मंडळ करतील. 20 ऑक्टोबरला सकाळी पाद्यपूजा व रात्रीचे भजन गुरुदेव भजनी मंडळ सर्कसपूर करतील. 21 ऑक्टोबरला सकाळी पाद्यपूजा व रात्रीचे भजन जिवनविकास भजनी मंडळ मिरजापूर करतील, 22 ऑक्टोबरला सकाळी पाद्यपूजा व रात्री होमहवन पूर्णाहुती, 23 ऑक्टोबरला सकाळी 10 ते 12 काला व कौंडण्यपूर देऊरवाडा भजन मंडळाचे भजन होईल. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद होईल. सर्व भाविकांनी वरील कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अंबिका देवी संस्थान, कौंडण्यपूर यांनी केले आहे.
 
 
या मंदिरांमध्येही नवरात्रोत्सव
जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यातल्या गणोरा देवी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात, मोर्शी तालुक्यातल्या नेरपिंगाई येथील पिंगळादेवी मंदिरात, धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या मंगरूळच्या रेणुका माता मंदिरात, अंजनगाव सुर्जी तालुक्यातल्या मुर्‍हा येथील मुर्‍हा देवी मंदिरात, चिखलदर्‍याच्या देवी मंदिरासह अन्य प्रमुख मंदिरामध्ये नवरात्रोत्सव विविध कार्यक्रमांसह साजरा होणार आहे.