ग्रामसचीवांकडून ग्रामरोजगार सेवकाची आर्थिक अडवणूक

18 Oct 2023 17:35:43
मानोरा, 
Gram Rojgar Sevak तालूक्यातील स्थानिक ग्राम पंचायत व पंचायत समितीचा प्रशासकीय दुवा म्हणून शासकीय सेवेत असलेले अनेक ग्रामसेवक ग्रामविकास तर दूर ग्रामीण भागात शासनाकडून तोकड्या मानधनावर काम करीत असणार्‍या स्थानिक नागरिकांचीच महिनोमहिने शासनाने दिलेले मानधन सुद्धा वेळेवर देत नसल्याने ग्रामसेवक स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आहेत की आर्थिक व मानसिक अडवणूक करण्यासाठी असा प्रश्न माहुली येथे नेमणुकीला असलेल्या ग्रामसेवकांच्या कारभारावरून पुढे येत आहे.
 
 
Gram Rojgar Sevak
 
महाराष्ट्र ग्राम रोजगार हमी योजनेअंतर्गत माहुली येथे मानधन तत्वावर ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेल्या स्थानिक व्यक्तीला यापूर्वी शासनाकडून मिळणारे मानधन वेळेवर मिळत होते. Gram Rojgar Sevak माहुली ग्रामपंचायतला ग्राम सचिव म्हणून नियुक्ती असलेले व कधीतरी गावामध्ये उगविणारे चिकटे नावाचे ग्रामसचिव येथील ग्रामरोजगार सेवक पंडित राठोड यांचे गत पाच महिन्याचे ग्राम रोजगार सेवकाचे बँक खात्यामध्ये जमा झालेले असतानाही या मानधनाचे धनादेश देण्यास प्रचंड कुचराई करीत आहेत. ग्राम रोजगार सेवक पंडित राठोड यांनी ग्रामसचिव चिकटे यांची अनेक वेळा न मिळालेल्या मानधना संदर्भात प्रत्यक्ष भेट घेतली व दूरध्वनीवर अनेक वेळा संपर्क साधला असता मधाहूनही गोड बोलून सातत्याने ग्रामसचिव राठोड यांना पुढील तारीख देत असल्याने ग्रामरोजगार सेवक आर्थिक अडचणीत आलेले आहेत. सध्या दसरा आणि दिवाळी हे मोठे सण समोर असून थकलेले मानधनाचे धनादेश संबंधित ग्रामसेवकाने तातडीने न दिल्यास इच्छा नसतानाही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामरोजगार सेवक पंडित राठोड यांनी ग्रामसेवक तथा पंचायत समिती मानोरा येथील वरिष्ठ अधिकार्‍यांना दिला आहे.
Powered By Sangraha 9.0