तभा वृत्तसेवा
वरठी,
Choundeshwari Temple स्व. बाबुरावजी मेंढे स्मृती प्रतिष्ठान भंडारा व राजमाता जिजाऊ फाउंडेशन यांच्यावतीने नवरात्रीनिमित्त माता चंडेश्वरी मंदिर देवस्थान मोहाडी येथे धर्मार्थ फिरते आरोग्य पथक रुग्णालय स्थापन करण्यात आले. यावेळी मंदिरात उपस्थित शेकडो भाविकांची आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक नवरात्र उत्सव मंडळाच्या ठिकाणी धर्मार्थ आरोग्य पथकाद्वारे आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. Choundeshwari Temple मोहाडी येथील शिबिरात डॉ. शहारे, क्रिष्णा ठवकर, लक्ष्मीकांत दांडेकर, अमन तांडेकर, अजय वासनिक, शिल्पा पेंदाम, रुमा उइके, प्रिती कागडे, मोहाडी नगरपंचायत अध्यक्ष छाया डेकाटे, सभापती दिशा निमकर, उपाध्यक्ष सचिन गायधने, नगरसेवक ज्योतिष नंदनवार, सविता साठवणे, वंदना पराते, कर्मचारी इलमे, पडोळे, कोहाड, मनिष वाघाये, विजय शहारे, सूरज परदेशी आदी उपस्थित होते.