पाया नसलेले रहस्यमय मंदिर : बृहदेश्वर

19 Oct 2023 18:01:20
दखल
Brihadeshwar temple : शहाजहानने कधी असा विचार केला असेल किंवा त्याला असे स्वप्न पडले असेल की त्यांच्या बेगमसाठी म्हणजेच मुमताजसाठी जगातील प्रसिद्ध ताजमहाल बांधला जाईल. मध्ययुगीन काळापासून आजतागायत ताजमहाल ही एक इमारत आहे; ज्यासारखी इमारत कोणीही बांधू शकले नाही. जर भारतीय इतिहास पाहिला तर प्राचीन काळापासून मध्ययुगीन भारतापर्यंत अशा बर्‍याच इमारती किंवा मंदिरे बांधली गेली; जी आजपर्यंत कोणीही बांधलेली नाहीत. त्याचप्रमाणे, दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये बृहदेश्वर मंदिर (Brihadeshwar temple) बांधले गेले. हे प्राचीन मंदिर जगातील सर्वात अद्वितीय मंदिर आहे. तत्कालीन चोला राज्यकर्ता राजाचे विदेशात प्रवास करण्यापूर्वी स्वप्न होते आणि त्याने जगातील पहिले ग्रॅनाइटमध्ये बनलेले मंदिर बांधण्याचे ठरविले होते. भारत असा देश आहे जिथे तुम्हाला गावात आणि प्रत्येक शहरात मंदिरे सापडतील, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारत एक असा देश आहे जिथे मंदिरे त्यांच्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहेत, त्याच्या इतिहास आणि रहस्यांसाठी ती जगभरात ओळखली जातात. या मंदिरांच्या रहस्यांचे शास्त्रज्ञांनाही आश्चर्य आहे. असेच एक मंदिर आहे, ज्याचे बांधकाम चोल वंशाच्या राजांनी केले होते.
 
Brihadeshwar temple
 
हे मंदिर तामिळनाडूच्या तंजावर शहरात आहे. ज्याचे नाव आहे (Brihadeshwar temple) बृहदेश्वर मंदिर. हे मंदिर स्थानिक भाषेत राजराजेश्वरम म्हणून ओळखले जाते. ते तंजाई पेरिया कोविल म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराचे रहस्य 1 हजार वर्षे टिकून आहे. एवढा कालावधी लोटूनही अभियंत्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत कोणीही ते सोडवू शकलेले नाही. ते मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. यासोबतच हे मंदिर त्याच्या भव्यतेसाठी, स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे. अनेकजण हे मंदिर ‘तानजोरचे मंदिर’ या नावाने देखील ओळखतात. घुमटामुळे हे मंदिर जगभर ओळखले जाते. या मंदिराचा जागतिक वारशातही समावेश आहे.
 
 
1003-1010 मध्ये चोल शासक राजा राजराजा पहिला याच्या काळात (Brihadeshwar temple) बृहदेश्वर मंदिर बांधले गेले. असे मानले जाते की राजा भगवान शंकराचा मोठा भक्त होता. त्यामुळे त्याने अनेक शिवमंदिरे बांधली, यालाही मान्यता आहे. जेव्हा राजा चोल-पहिला श्रीलंकेला गेला, तेव्हा त्याने एक स्वप्न पाहिले ज्यामध्ये त्याला हे मंदिर बांधण्याची आज्ञा मिळाली. त्यानंतरच त्याने या मंदिराच्या उभारणीचे काम सुरू केले.
 
जगातील पहिले ग्रॅनाईटचे मंदिर
बृहदेश्वर मंदिर (Brihadeshwar temple) ग्रॅनाइटचे बनलेले आहे. हे मंदिर सुमारे 1.3 लाख वजनाच्या ग्रॅनाइट दगडांनी बांधले आहे, तर या मंदिराच्या 100 किलोमीटरच्या परिघात ग्रॅनाइटचे दगड आढळतात. असेही मानले जाते की, हे जगातील पहिले मंदिर आहे जे केवळ ग्रॅनाइटचे बनलेले आहे. हे 13 मजली मंदिर ज्याची उंची सुमारे 66 मीटर आहे. या मंदिराच्या बांधकामातील दगड कोणत्याही रसायनाने किंवा चुन्याने जोडलेले नसून,हे मंदिर दगडांमध्ये चर बनवून उभारले गेले आहे. ते कापून आणि दगडांना एकत्र चिकटवून बांधले गेले.
 
पाया नसलेले मंदिर
या मंदिराचे आणखी एक मोठे रहस्य आहे, ते म्हणजे या मंदिराची वास्तुकला. हे जाणून आश्चर्य वाटेल की हे मंदिर कोणत्याही पायाशिवाय बांधले गेले आहे. म्हणजे, बांधकामाच्या वेळी पाया खोदला गेला नाही तर मंदिर थेट जमिनीच्या वर बांधले गेले. बांधकाम सुरू झाले, जे हजार वर्षांनंतरही तसेच आहे. या मंदिराशी संबंधित आणखी एक रहस्य आहे. असे म्हटले जाते की या मंदिराच्या शिखरावर सुमारे 88 मूर्ती ठेवल्या आहेत. एक टन वजनाचा दगड, ज्याच्या वर सुमारे 12 फूट उंच कलश ठेवला आहे. ज्यावर सूर्य-चंद्राचा प्रकाश पडल्यावर आणि चंद्राचा प्रकाश पडल्यावर पृथ्वीवर सावली दिसत नाही, फक्त शिखर नसलेले मंदिर दिसते. फक्त त्याची सावली दिसते.
 
 
साधारणत: कोणत्याही मंदिरावर सूर्यप्रकाश होताच मंदिराची सावली जमिनीवर दिसून येते, परंतु या मंदिराची सावली नाही. लोकांच्या म्हणण्यानुसार, हे घुमट 80 टक्क्यांहून अधिक दगड तोडून बनविण्यात आले आहे. या मंदिराचा माथा एकाच दगडात कोरलेला होता. मंदिरावर सुवर्णकळस असून तोही एकाच अखंड दगडातून बनविला गेला आहे. आता आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे 88 टन वजनाचा एवढा मोठा दगड, क्रेनशिवाय एवढी उंची गाठणे आणि हजार वर्षांनंतरही अशा पद्धतीने बसवणे, हा स्वतःमध्येच उत्कृष्ट वास्तुकलेचा पुरावा आहे. असे सांगतात की सहा किलोमीटरचा रँप बनवून त्यावरून हा कळस हत्तींच्या साह्याने ओढून नेऊन बसविला असावा. हे मंदिर तंजावर शहरातून कुठूनही दिसते.
 
भगवान शिवाला समर्पित मंदिर
बृहदेश्वर मंदिर (Brihadeshwar temple) भगवान शिवाला समर्पित आहे. या मंदिरात स्थापित शिवलिंगाच्या वरती एक मोठा पंचमुखी साप फणा पसरवून बसला आहे, जणू तो भगवान भोलेनाथकडे पाहत आहे. या मंदिरात दोन्ही बाजूला 6-6 फूट अंतरावर जाड खांब आहेत. भिंती बांधल्या आहेत. त्याच्या बाहेरील भिंतींवरील मोठ्या आकाराला ‘विमान’ म्हणतात. मु‘य विमानाला दक्षिणा मेरू म्हणतात. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान शिवही नंदीवर स्वार होतात. शिवाचा महाकाय पुतळा येथे बसवला आहे. हे शिल्प एकाच दगडात कोरलेले आहे. त्याची उंची 13 फूट आहे.
 
जागतिक वारशात समावेश
बृहदेश्वर मंदिराचा (Brihadeshwar temple) 1987 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसामध्ये समावेश केला होता. या मंदिरात संस्कृत आणि तमिळ भाषेतील शिलालेख आहेत, ज्यामध्ये दागिन्यांशी संबंधित माहिती दिली आहे.
 
बृहदेश्वर मंदिरात कसे जायचे?
तंजावरचे सर्वात जवळचे प्रमुख शहर तिरुचिरापल्ली आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे स्टेशन आहे. तंजोर शहरासाठी जवळपासच्या सर्व प्रमुख शहरांमधून वाहतूक आहे. सर्व संसाधने सहज उपलब्ध आहेत.
 
 
मंदिराला तेरा मजले
भारतातील कोणत्याही राज्यात 13 मजले असलेली फारच कमी मंदिरे आहेत. त्यात (Brihadeshwar temple) बृहदेश्वर मंदिराचा समावेश होतो. हे मंदिर त्याकाळी जगातील सर्वात उंच मंदिर मानले जात होते. या मंदिराची उंची सुमारे 66 मीटर आहे. कावेरी नदीवर वसलेले हे मंदिर एक हजाराहून अधिक वर्षांपासून कृतज्ञतेने उभे आहे. 2004 च्या त्सुनामीमध्येही हे मंदिर सुरक्षित होते. मंदिराच्या दगडांवर संस्कृत आणि तामिळ भाषांमध्ये लिहिलेले आश्चर्यकारक शिलालेख आणि शब्द सहजपणे दिसू शकतात. मंदिरात सुमारे 13 फूट उंच शिवलिंग देखील बांधले गेले आहे.
तरंगणारे मंदिर
या मंदिरास तरंगणारे मंदिर देखील म्हटले जाते. या मंदिराचे बांधकाम (Brihadeshwar temple) अशा प्रकारे केले गेले आहे की या मंदिरात उपस्थित कोणताही स्तंभ दगडांनी चिकटविला गेला नाही. केवळ दगड कापून एकमेकांशी स्थिर केले गेले आहेत. हे भव्य मंदिर बांधण्यासाठी 13 हजारांहून अधिक ग्रॅनाइट दगडांचा वापर केला गेला. आजही सर्व खांब उभे आहेत.
 
(‘पाञ्चजन्य’वरून साभार)
Powered By Sangraha 9.0