उंबर्डा बाजार येथे स्वच्छता ही सेवा

    दिनांक :02-Oct-2023
Total Views |
उंबर्डा बाजार, 
Umbarda Bazar स्वच्छता ही सेवा’ अभियानां अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी उंबर्डा बाजार येथे सकाळी १० वाजता एक तासाच्या स्वच्छता श्रमदानात अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी आणि गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वच्छतेकरीता श्रमदान केले. गावातील मुख्य मार्गाची व चौकाची स्वच्छता करण्यात आली. ग्रामस्थांनी गाव कचरा मुक्त करण्याकरीता श्रमदान केले.
 
Umbarda Bazar
 
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर ह्या स्वच्छ भारत दिवशी स्वच्छतेकरीता जनआंदोलन केले जाते. यावेळी या कार्यक्रमाचे औचित्य साधून १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान विविध उपक्रमांनी राज्यभर राबविण्यात येत आहे. ’कचरामुक्त भारत’ थीम असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानादरम्यान Umbarda Bazar उंबर्डा बाजार येथील बसस्थानक, श्री गजानन महाराज मंदिर परिसर व मुख्य मार्गावर ग्रामपंचायत व भाजपा पदाधिकारी यांच्या नेतृत्वात सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. यावेळी कारंजा पंचायत समितीचे सभापती प्रदीप देशमुख, माजी सरपंच अशोक मोरे, माजी उपसरपंच राजू घोडे, वसंत हळदे, राजू गाढवे, ग्रामविकास अधिकारी जयकिसन आडे, चंदन घोडे, घनश्याम लोहाणा व गावकरी मंडळी उपस्थित होती.