वाशीम,
Disbursement subsidy राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे जुलै ते सप्टेंबर २०२३ या कालावधीतील अनुदान ऑटोबर २०२३ मध्ये प्राप्त झाले.प्राप्त झालेले अनुदान जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम यांच्याकडून सर्व तहसील कार्यालयांना लाभार्थी संख्येनुसार व त्यांनी केलेल्या मागणीनुसार वितरित करण्यात आले.
केंद्र पुरस्कृत योजनेसाठी अद्यापही अनुदान प्राप्त झालेले नाही.अनुदान प्राप्त होताच त्याचे वितरण करण्यात येणार आहे. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्वसाधारण २१ हजार ६०३ लाभार्थ्यांना,संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुसूचित जातीच्या ७३८२ लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२३ पर्यंतचे,संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुसूचित जमातीच्या १९३४ लाभार्थ्यांना ऑगस्टपर्यंतचे, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या ३५ हजार ७ सर्वसाधारण लाभार्थ्यांना सप्टेंबरपर्यंतचे, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अनुसूचित जातीच्या १२ हजार ७७ लाभार्थ्यांना सप्टेंबरपर्यंतचे, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमातीच्या २१६६ लाभार्थ्यांना सप्टेंबरपर्यंतचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.Disbursement subsidy जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत ९५ हजार ९४२ लाभार्थी असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी दिली.