अग्रलेख
skill development-India देशाला गेल्या काही वर्षांपासून ज्या काही समस्या सातत्याने भेडसावत आहेत, त्यात महागाई आणि बेरोजगारी या दोन प्रमुख समस्या आहेत. या दोन्ही समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आतापर्यंत कोणत्याही सरकारला शक्य झाले नाही आणि पुढेही शक्य होईल, असे वाटत नाही. skill development-India कारण कोणताही आणि कसाही तोडगा काढला तरी या समस्या कायम राहतात वा नव्या स्वरूपात समोर येतात. त्यामुळे या समस्यांवर त्या त्या काळात काळानुरूप मात करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा तो प्रयत्न यशस्वी होतो, काही वेळा नाही. कारण या दोन्ही समस्या सापेक्ष आहेत. समाजातील सगळ्याच लोकांना त्या भेडसावतात असे नाही. skill development-India या दोन्ही समस्यांचा केंद्रबिंदू हा सामान्यपणे गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस असतो. गरीब माणसाला महागाईची झळ पोहोचते तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाला बेरोजगारीच्या समस्येची. उच्च मध्यमवर्गीय तसेच श्रीमंत वर्गाला या दोन्ही समस्यांचा तेवढ्या तीव्रतेने सामना करावा लागत नाही. कारण ते आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात. विशेषत: या दोन्ही समस्यांचा संबंध गरिबीशी आहे. skill development-India रोजगार नसल्यामुळे म्हणजे बेरोजगार असल्यामुळे गरिबी आहे आणि गरिबी आहे म्हणून जीवघेण्या महागाईचा सामना करावा लागत आहे.
आपल्या देशात दोन प्रकारचे रोजगार आहेत; एक म्हणजे सरकारी नोकऱ्या आणि दुसरे म्हणजे खाजगी क्षेत्रातील रोजगार. आपल्या देशातील अवाढव्य लोकसंख्या पाहता या दोन्ही क्षेत्रातील रोजगार अपुरे आहेत. सरकारी नोकऱ्यांना मर्यादा आहेत. सरकारी नोकऱ्यातही राज्य सरकारच्या नोकऱ्या आणि केंद्र सरकारच्या नोकऱ्या असे ढोबळमानाने आपल्याला दोन भाग करता येतील. skill development-India खाजगीकरणानंतर देशातील खाजगी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असले आणि हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करीत असले, तरी आपल्या देशातील वाढत्या लोकसंख्येची गरज ती भागवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सरकारी क्षेत्र असो की खाजगी; या क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी शैक्षणिक पात्रतेसोबत कौशल्याचीही गरज असते. या दोन्ही क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी स्पर्धाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्या देशात एका जागेसाठी किमान ५०० दावेदार असतात. नोकऱ्यांची संख्या कमी आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या अमर्याद असे झाले आहे. skill development-India त्यामुळेच केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी नेहमी सांगत असतात, नोकऱ्या मागणारे बनू नका तर नोकऱ्या देणारे बना! म्हणजे स्वयंरोजगार शोधा, स्वत:ही आपल्या पायावर उभे राहा, आर्थिकदृष्ट्या भक्कम व्हा आणि दुसऱ्यालाही आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करा.
skill development-India याचाच भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य पद्धतीने उद्घाटन केले. महाराष्ट्रातील ३५० तालुक्यात अशी ५११ केंद्रे सुरू केली जाणार आहेत. कौशल्य विकास प्रशिक्षणातून युवकांच्या जीवनात नवी पहाट येईल, असे जे मोदी यांनी म्हटले, ते योग्य आहे. शिक्षण आहे, पण कौशल्य नाही. त्यामुळे युवकांना रोजगार मिळत नाहीत. skill development-India रोजगार नसल्यामुळे देशातील तरुण निराशेच्या अंधकारात लोटला गेला आहे. यातून तो वाममार्गाकडेही वळत आहे. रिकामे डोके सैतानाचे घर असे म्हटले जाते, त्याची प्रचीती तो घेत आहे. त्याचा फटका मात्र समाजाला बसत आहे. काही असामाजिक शक्ती निराशेच्या गर्तेत सापडलेल्या तरुण पिढीचा गुन्हेगारी आणि दहशतवादी कामासाठी उपयोग करीत आहेत. त्यामुळे देशाला नव्या संकटाचा आणि आव्हानाचा सामना करावा लागत आहे. भरकटलेल्या तरुणांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. skill development-India त्यादृष्टीने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र उपयुक्त ठरणार आहेत. आज देशाला विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. तरुण पिढीला असे प्रशिक्षण देऊन कुशल बनवले तर देशासमोरील अनेक समस्या सुटू शकतात. विध्वंसक मार्गाकडे वळणाऱ्या तरुण पिढीला आम्ही विधायक मार्गाकडे वळवू शकतो.
मोदी सरकारला याची जाणीव आहे. skill development-India त्यामुळेच २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने यासाठी स्वतंत्र अशा कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली. याआधीच्या सरकारांना ते सुचले नाही. वेगळ्या मार्गाने विचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे महत्त्व जाणले आणि तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी या मंत्रालयाची स्थापना केली. कारण मोदी सरकारचे उद्दिष्ट देशाला विकसित करण्याचे, विश्वगुरू बनवण्याचे आहे. देश तेव्हाच विश्वगुरू बनू शकतो, जेव्हा देशातील युवाशक्ती विधायक मार्गाला लागेल. skill development-India देशाची अर्थव्यवस्था पाच बिलियन डॉलर करण्याचे म्हणजे जगातील तिसरी अर्थव्यवस्था करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट मोदी यांनी देशवासीयांसमोर ठेवले आहे. या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी देशातील तरुणांचे सहकार्य सरकारला हवे आहे. कौशल्ययुक्त युवापिढीच देशासमोरील हे आव्हान यशस्वीपणे पेलू शकणार आहे. मोदी यांच्या या यज्ञात महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास केंद्राच्या माध्यमातून योगदान देण्याचा संकल्प सोडला, ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणावी लागेल.skill development-India
यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रिद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेही अभिनंदन केले पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्यप्राप्त तरुणांची आज देशालाच नाही तर जगालाही गरज आहे. १६ देशांमध्ये ४० लाख प्रशिक्षित युवकांची गरज असल्याचे एका सर्वेक्षणात म्हटले आहे. skill development-India याचा अर्थ जगात रोजगाराची कमी नाही तर कौशल्ययुक्त म्हणजे प्रशिक्षित युवकांची गरज आहे. प्रशिक्षणप्राप्त युवक उपाशी राहू शकत नाही. तो स्वत:चे आणि सोबत आपल्या कुटुंबाचेही पोट भरू शकतो. जगाच्या अनेक भागात दहशतवादाचा राक्षस जे थैमान घालत आहे, त्याचे मूळ बेरोजगारीच्या समस्येत दडले आहे. हाताला योग्य काम मिळाले तर ते हात चुकीच्या, समाजविघातक कामाकडे वळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. उलट अडचणीत असलेल्या माणसाला मदतीचा हात देतात. भारत हा जगातील सर्वात तरुण लोकसंख्येचा देश आहे, असे म्हटले जाते. जगातील अनेक देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. skill development-India त्यामुळे हे देश एका अर्थाने परावलंबी होत चालले आहेत. अशा स्थितीत आमच्या देशातील तरुणांची वाढती संख्या ही आमच्यासाठी शाप नाही तर वरदान सिद्ध होणारी आहे. या तरुणांच्या बळावर अनेक अशक्य गोष्टी आम्ही शक्य करू शकतो.
देशाला विकासाच्या, प्रगतीच्या वाटेवर नेऊ शकतो. देशातील तरुणांची वाढती संख्या ही आमच्यासाठी लायबिलिटी नाही तर अॅसेट ठरणार आहे. त्यादृष्टीने मोदी सरकार करीत असलेल्या उपाययोजना उपयुक्त आहेत. रिकाम्या तरुणाच्या हातात दगड येणार नाही, याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. skill development-India अप्रशिक्षित तरुण या दगडाचा वापर कोणाचे डोके फोडण्यासाठी करू शकतो; याउलट एखाद्या प्रशिक्षित आणि कुशल तरुणाच्या हातात दगड आला तर तो त्यातून सुरेख आणि सुबक अशी मूर्ती घडवू शकतो. हे शक्य होणार आहे, त्याला प्रशिक्षण देण्याने. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून हे काम प्रभावीपणे होईल, यात शंका नाही. ही केंद्रे रोजगार देणारे मंदिर ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहेच. skill development-India देशातील कौशल्यप्राप्त तरुण पिढी या मंदिरातील पुजारी आणि उपासक म्हणून समोर येतील आणि बेरोजगारीच्या समस्येमुळे अनेक आव्हांनाचा सामना कराव्या लागणाऱ्या आपल्या देशाचे विश्वविख्यात असे अमृत उद्यान झाल्याशिवाय राहणार नाही.