रोहित शर्माने षटकांने रचला इतिहास

23 Oct 2023 09:53:48
नवी दिल्ली,
Rohit Sharma भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात एक वेगळीच शैली पाहायला मिळाली. स्फोटक फलंदाजी करताना त्याने यंदा प्रत्येक संघाच्या गोलंदाजांवर कहर केला आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शून्यावर बाद झाल्यापासून त्याच्या बॅटला आग लागली आहे. षटकारांचा वर्षाव करताना रोहित शर्माने एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल या दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले. आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या कर्णधाराची सुरुवात खूपच खराब झाली होती. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माला खाते न उघडताच माघारी पाठवले. या सामन्यातील निराशा मागे टाकत कर्णधाराने पुढील तीन सामन्यांमध्ये वादळ निर्माण केले आहे.
 
 
dw43w4
 
रोहित शर्माच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस पडत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्रिशतक पूर्ण करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने सर्व महान खेळाडूंना मागे टाकले. एका कॅलेंडर वर्षात षटकारांचे अर्धशतक ठोकणारा रोहित शर्मा आता जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. Rohit Sharma यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये आणि वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलने 2019 मध्ये अशी कामगिरी केली होती. डिव्हिलियर्सने एका कॅलेंडर वर्षात 58 षटकार ठोकले तर गेलच्या नावावर 56 षटकार आहेत. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने एकूण 49 षटकार मारले आहेत. रोहित शर्मा आता या यादीत ३८ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. विश्वचषकात एबी डिव्हिलियर्सच्या नावावर एकूण 37 षटकार होते.
Powered By Sangraha 9.0