हेरगिरीच्या सम्राटाला बेसावध गाठले !

al aqsa flood-mossad व्यापार-अन्य बाबतीत सहकार्य

    दिनांक :23-Oct-2023
Total Views |
आंतरराष्ट्रीय
- वसंत गणेश काणे
al aqsa flood-mossad इस्रायलला आपल्या गुप्तहेर यंत्रणेचा सार्थ अभिमान आहे. पण हमास या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याचा तिला सुगावा लागू नये, ही आश्चर्यकारक घटना ७ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली आणि इस्रायलचे जगभर हसे झाले. असे म्हणतात की, हमासने अगोदर इस्रायलची सर्व संपर्क यंत्रणाच उद्ध्वस्त केली. al aqsa flood-mossad सध्या सुरू असलेले युद्ध इस्रायल जिंकेल यात शंका नाही; पण या विजयाने सध्या झालेली बेअब्रू आणि फजिती कधीही विस्मृतीत जाणार नाही. कारण कुंपणापलीकडे असलेल्या गाझापट्टीत हमासची सर्वंकष स्वरूपाच्या हल्ल्याची, ऑपरेशन अल अक्सा फ्लडची तयारी निदान काही महिने अगोदरपासून सुरू असली पाहिजे. पण हे इस्रायलला कळू नये, ही बाब आश्चर्यकारक आहे. al aqsa flood-mossad हल्ल्यांसाठी शस्त्रास्त्रांचा पुरवठा इराणने व तुर्कस्तानने केला याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. डझनावारी फायटर विमाने इस्रायलच्या हद्दीत घुसली. रॉकेट्सना हवेतच नष्ट करणारी आयर्न डोम यंत्रणा/व्यवस्था इस्रायलने विकसित केली आहे. al aqsa flood-mossad पण यावेळी तिला यश मिळाले नाही. हल्ल्यात दूरवरच्या जेरूसलेम आणि तेल अविवमधल्या इमारतीसुद्धा जमीनदोस्त झाल्या.
 
 
 
al aqsa flood-mossad
 
al aqsa flood-mossad गाझा पट्टीवर आहे हमासची सत्ता : गाझा पट्टीत सध्या हमास हा दहशतवादी गट सत्तेवर आहे. गाझा पट्टीतून आधी हजारो छोटी क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि नंतर जमीन व समुद्रमार्गे हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये शिरले. त्यांनी वेगवेगळ्या किबुत्झमध्ये योम किप्पूरची सुट्टी साजरी करणाऱ्या नागरिकांवर बेछूट गोळीबार केला. नंतर सीमा ओलांडून आत घुसलेल्या दहशतवाद्यांनी परतताना अनेक महिला आणि मुलांना ओलीस म्हणून गाझा पट्टीत नेले आहे.
अनेक किबुत्झचा नाश : किबुत्झ हा इस्रायलमधील सामूहिक जीवन जगणारा गट आहे. बहुतेक स्थलांतरित ज्यू असे गट करून ठिकठिकाणी राहतात. एका किबुत्झमध्ये अनेक कुटुंबे असतात. al aqsa flood-mossad एक हजारपर्यंतच्या व्यक्तींचे सांघिक स्वरूपाचे सामूहिक जीवन हे स्थलांतरित लोक जगत असतात. किबुत्झमधील सामूहिक एकजिनसीपणा टोकाला पोहोचलेला असतो. इतका की, आपल्या कोणत्याही मुलाचे पितृत्व नक्की कुणाकडे आहे, हे कोणतीही आई सांगू शकत नाही, असे म्हणतात. स्थलांतरितांच्या या किबुत्झकडे आजच्या सांस्कृतिक मापदंडाने पाहण्यात अर्थ नाही. उलट किबुत्झ हा एखाद्या ग्रंथाचा आणि समाजशास्त्रज्ञांसाठीचा संशोधनाचा विषय असू शकेल. विशेष हे आहे की, इस्रायलमधील ३ टक्के लोक असे एकत्र जीवन जगतात. हमासच्या हल्ल्यात अनेक किबुत्झ नष्ट झाले आहेत. al aqsa flood-mossad भूतलावरच्या वाटेवेगळ्या सामूहिक जीवनाचे प्रतीक असलेली एक जीवन पद्धती हमासच्या हल्ल्यात फार मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. या हल्ल्याची ही एक वेगळ्याच प्रकारची पण अपरिमित हानी म्हणावी लागेल.
 
 
हिजबुल्ला गट : लेबनॉनमध्ये मूळ धरून बसलेल्या हिजबुल्ला गटानेही इस्रायलबरोबर संघर्ष करायला सुरुवात केलेली आहे. हिजबुल्ला म्हणजेच शियांचा अल्लांचा पक्ष. हा राजकीय गट जसा आहे तसाच तो एक लष्करी गटसुद्धा आहे. मौलवीही असलेला हसन नसरल्ला हा या गटाचे नेतृत्व करतो. al aqsa flood-mossad हिजबुल्लाचा राजकीय गट लेबनॉनमधील रेझिस्टन्स ब्लॉक या राजकीय पक्षासोबत असतो तर लष्करी दहशतवादी गट हल्ले करतो. सध्याच्या लष्करी संघर्षात छुपेपणाने इराण तर उघडपणे हमास आणि हिजबुल्ला गट हे तिघे सक्रिय आहेत. पैसा आणि शस्त्रास्त्रे पुरवून इराण आणि तुर्कस्तान हे गटाचे महत्त्वाचे छुपे साथीदार बनले आहेत. हमास या दहशतवादी संघटनेची शाखा लेबनॉनमध्येही सक्रिय असून ओसामा हमदान हा या शाखेचा प्रमुख आहे. इस्रायलवर हमासने हल्ला करताच लेबनॉनमधूनही हल्ले होण्यास सुरुवात का झाली, ते लक्षात येण्यासाठी हा तपशील उपयोगी पडेल असा आहे. al aqsa flood-mossad अशाप्रकारे इस्रायलला लागून असलेल्या लेबनॉनमधून हल्ले सुरू झाल्यामुळे इस्रायलला दुसऱ्या आघाडीवरही लढावे लागत आहे. अरबांनी इस्रायलशी शांतता करार करावेत म्हणून अमेरिका प्रयत्न करीत असून त्या प्रयत्नांना यशही येत चालले होते.
 
 
अमेरिकेशी या बाबतीत स्पर्धा करीत चीनही अशाच खटपटीत आहे. लेबनॉनशिवाय सीरिया, जॉर्डन आणि इजिप्त यांच्याही सीमा इस्रायलला लागून आहेत. पैकी इजिप्तने इस्रायलला मान्यता दिलेली आहे. पण या तिघांपैकी सीरिया आणि जॉर्डन यांनी जर इस्रायलशी युद्ध सुरू केले तर या संपूर्ण आखातात दीर्घकाळ संघर्ष सुरू राहील आणि तो अतिशय रक्तरंजित असेल. सध्या इराणचे विदेश मंत्री सीरियाला भेट द्यायला निघाले असताना इस्रायलने दमास्कस विमानतळावर क्षेपणास्त्रे डागली. al aqsa flood-mossad त्यांना विमानातून उतरता आले नाही व परत जावे लागले. युद्धाच्या कक्षा वाढू नयेत म्हणून अमेरिकेने आपली शस्त्रदले भूमध्य सागरात आणून ठेवली आहेत आणि या युद्धात आणखी इतर कुणी दखल देऊ नये, असा दम दिला आहे. सध्या सौदी अरब आणि इस्रायलमध्ये शांतता व सहकार्याचा करार व्हावा असे प्रयत्न सुरू आहेत. इतर अरब राष्ट्रांनीही असे शांतता करार इस्रायलशी करावेत म्हणूनही अमेरिका प्रयत्नशील आहे. al aqsa flood-mossad या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही येत चालले होते. ही प्रक्रिया थांबावी म्हणून इराणला हाताशी धरून चीनच्या चिथावणीने हा संघर्ष सुरू झाला आहे, यात शंका उरलेली नाही. इराण आणि चीन यांच्यात सध्या व्यापार आणि अन्य बाबतीत सहकार्याचे वातावरण आहेच.
 
 
या संघर्षाचा बोलविता धनी म्हणून चीनकडे अंगुलिनिर्देश का केला जातो, यावर या तपशिलामुळे प्रकाश पडू शकेल. आता एका अरब राष्ट्राविरुद्ध युद्ध करणाऱ्या इस्रायलशी करार करण्यापूर्वी सौदी अरब दहादा विचार करील. इस्रालयमध्ये हल्ला करताना हमासच्या वतीने पत्रके टाकण्यात आली आहेत. पॅलेस्टाईनला वगळून इस्रायलसोबत शांतता करार कसा काय केला जाऊ शकतो अशा आशयाचा मजकूर या पत्रकात आहे. al aqsa flood-mossad तसेच हमासच्या प्रवक्त्यांनी सर्व अरब विश्वाला इस्रायलविरुद्ध एक होण्याबाबत आवाहन केले आहे. पण इस्रायलच्या निर्धारावर या आवाहनाचा परिणाम होणार नाही, हे नक्की. इस्रायलची चिंता  वेगळीच आहे. हमासने आपल्यासोबत जे नागरिक आणि इस्रायली सैनिक नेले आहेत त्यांच्याबरोबर अनेक महिला व मुलांनाही ओलीस म्हणून नेले आहे. यांची सुखरूप सुटका हा इस्रायलसमोरचा आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे. al aqsa flood-mossad इस्रायलने म्हणूनच गाझा पट्टीची कोंडी केली असून वीज आणि जीवनावश्यक सर्व घटकांचा गाझा पट्टीला होत असलेला पुरवठा थांबवला आहे. ओलिसांना सोडाल तरच कोंडी उठेल, असा इशारा इस्रायलने हमासला दिला आहे.
 
 
दुसऱ्या महायुद्धात जर्मन फौजांनी लेनिनग्राडची अशीच कोंडी केली होती. यामुळे थंडी आणि उपासमारीमुळे लाखापेक्षा जास्त लोक मेले होते. सध्या इस्रायलकडून हमासच्या तळांवर जबरदस्त हल्ले होत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू त्यांनी हमासविरुद्ध युद्धाचीच घोषणा केली आहे. al aqsa flood-mossad हमासच्या दहशतवाद्यांना या युद्धात अशी अद्दल घडवली जाईल की, ज्याची त्यांनी कधीच कल्पनाही केली नसेल, अशा शब्दांत बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला ठणकावले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इस्रायलला भेटी देऊन त्या देशाला आपला पाठींबा दिला आहे; पण या युद्धाच्या कक्षा वाढू नयेत, यावरही त्यांचा भर आहे. al aqsa flood-mossad त्यासाठी हमासला संपवूनच थांबावे, गाझा पट्टीवर ताबा मिळविण्याच्या भानगडीत पडू नये. तसे केल्यास युद्धाच्या कक्षा वाढतील, यावर सध्याच्या तरल परिस्थितीत बायडेन ठाम आहेत.
९४२२८०४४३०