बाळाचे नशीब लिहिणारी शेलुबाजार येथील सटवाई माता

शेलुबाजार येथील शंभर वर्षापुर्वीचे सटवाईचे मंदीर

    दिनांक :23-Oct-2023
Total Views |
सुधाकर क्षीरसागर
मंगरुळनाथ,
Satwai at Shelubazar मनुष्याचं नशीब लिहिणारी आदिशक्ती म्हणजेच मंगरुळनाथ तालुक्यातील शेलुबाजारची सटवाई माता होय. अध्यात्मिक परंपरेत स्त्री देवतांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि या अनेकात एक म्हणजे सटवाई माता. येथील सटवाई मातेचे मंदीर खूप जुने असून हे एकमेव मंदिर असल्याचं मानलं जाते. बुद्धीची देवता, संपत्तीची देवता अश्या अनेक रूपात आदिशक्ती आहे. त्यापैकीच एक सटवाई माता. भूतलावरील प्रत्येक मानवाचे नशीब सटवाई माता ब्रह्मदेव यांच्या आदेशानुसार लिहित असते आणि त्यामुळेच प्रत्येक मानवाचे आराध्यदैवत सटवाई माता असल्याची भाविक भक्तांची धारणा आहे. बाळाच्या पाचवीला सटवाई मातेचे विधीवत पुजन करण्याची परंपरा अनेक कुटुंबात प्रचलीत आहे.
 
 
SDE4ER3R
 
कुठल्याही हिंदू परिवारात बाळाचा जन्म झाला की पाचव्या दिवशी सकाळी बाळाला अंघोळ घातल्यानंतर त्याच्या गळ्यात सटवाई मातेची प्रतिमा बांधले जाते. त्या बाळाचे भाग्य सटवाई माता उत्तम लिहिते असं मानलं जात. Satwai at Shelubazar साधारणपणे हे भाग्य गतजन्मीच्या कृत्यातून प्राप्त झालेल्या पुण्याने अधोरेखित होत असते, असे परंपरेने म्हटले जाते व यासाठी तेथे कोरा कागद व पेन ठेवला जातो. शेलुबाजार एक मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी असून तालुक्यामध्ये अनेक धार्मिक स्थळे आहे. जन्मलेल्या बाळाच्या भविष्यासाठी देवीच्या दर्शनाकरिता बाराही महिने सतत गर्दी राहते. ही सटवा आई रोगमुक्त करून सटवाई देवी मंदिरात येऊन पूजा केल्याने बाळाला दिर्घायुष्य लाभते अशी श्रद्धा आहे. बाळाच्या चांगल्या आयुष्यासाठी अनेक महिला काही तरी नवस बोलुन पुर्ण करतात व प्रसादाचे आयोजन करतात. आजूबाजूच्या गावातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. भक्त सटवा आईचे नाव घेऊन प्रत्येकाच्या घरात पाचवीची पूजा करतात. आईचे दर्शन लेकरांसाठी एक वरदान ठरते, असे देवीचे महत्व आहे.
 
 
देवीच्या चरणी ज्वारीची व मिसळीची भाकर, कांदा, अंबाडीची भाजी आवडीने देवीला प्रसाद म्हणुन ठेवतात. आख्यायिकेनुसार एका परिवारात अपत्य होत नसल्याने त्या परिवाराने सटवाई मातेला नवस केला की, हे माते मला जर मूल झाले तर मी तुला तुझा नैवेद्य देईल व मी तुझी सेवा करीन. त्यानंतर त्या परिवारात एका वर्षाने मूल जन्माला आले व त्यांनी मानलेला नवस देखील पूर्ण केला. सर्वात महत्त्वाच म्हणजे हिंदू परिवारात मुला-मुलींचे लग्न ठरल्यावर सर्वात आधी सटवाई मातेची पूजा करण्याची परंपरा आहे. विशेषतः लेवा पाटील समाजात ही प्रथा अधिक पाळली जाते. सटवाई मातेच्या नैवेद्यात कळण्याची भाकरी, अंबाडीची भाजी, लाल चटणी घरून तयार करून मंदिरात नवरदेव किंवा नवरीला आणून हा नैवेद्य दिला जात असतो. ते दोघे या मंदिरात जेवण करतात ही परंपरा मंगळवार किंवा शुक्रवार रोजी केली जाते. शेलुबाजार येथे घटस्थापनेला या मातेचा उत्सव देखील सुरू करण्यात आला. उत्सवात भजन, कीर्तन, सत्संग तसेच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम घेतले जातात. ही परंपरा आतापर्यंत चालू आहे.