असत्यावर सत्याच्या विजयाचा प्रतिक दसरा : खा. प्रफुल्ल पटेल

आकर्षक अतिषबाजीसह नूतन विद्यालयात रावणदहन

    दिनांक :25-Oct-2023
Total Views |
गोंदिया, 
Praful Patel दसरा सण मोठया उत्साहाने साजरी करण्याची परंपरा आहे. असत्यावर सत्याच्या विजय प्राप्त करणारा हा मोठा दिवस आहे. वैरावर प्रेमाने व शत्रूवर पराक्रमाने विजय प्राप्त करणारा हा दिवस विजया दशमी म्हणून साजरा केला जातो, असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले. सिव्हिल लाईन मामा चौक दसरा उत्सव समितीच्या वतीने आयोजित दसरा उत्सव व रावणदहण कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. समितीचे संयोजक नानू मुदलियार यांनी सिव्हील लाईन्स परिसरातील नूतन विद्यालयात आयोजित रावणदहनाच्या कार्यक्रमाची सलग 20 वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे.
 
 
Praful Patel
 
प्रसंगी Praful Patel खा. पटेल, माजी आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते वीर सैनिक, शासकीय कर्मचारी व रेल्वे कर्मचारी का सत्कार यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. खा. श्री पटेल यांनी नागरिकांना दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी देवेंद्रनाथ चौबे, सविता मुदलियार, राधेश्याम मेंढे, पियूष मुदलीयार, रोहित मुदलियार, राजा देशमुख, सोनू लाडे, कमलेश नशिने, अनिल यल्लुर, स्वप्निल पिल्ले, किरण वर्मा, दिव्या येल्लुर, पुष्पा देशमुख, युवराज नारनवरे, महेंद्र श्रीवास्तव, चंदु मेश्राम, राजेंद्र कटकवार, जितेंद्र सिंग, व्ही. पटले, पिंटू येळे, योगेश रामटेककर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन निरज नागपुरे यांनी केले. कार्यक्रमात श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान की आकर्षक झाकी, मथुरा येथिल श्री राधा कृष्णा नृत्य व मोर एवं गोड़ा नृत्य व फटाक्यांची भव्य अतिषबाजी कार्यक्रमांचे आकर्षण ठरली.