अर्जुनी मोर.शहराच्या विकासासाठी पालकमंत्र्यांना साकडे

युवक राकाँ जिल्हा उपाध्यक्ष साखरे यांची पालकमंत्र्यांशी चर्चा

    दिनांक :28-Oct-2023
Total Views |
अर्जुनी मोरगाव, 
Dharmarao Baba Atram : समाज सेवा हे प्रथम कर्तव्य याची जाणीव ठेवून जनतेचा विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणण्यासाठी नगरपंचायत नगरसेवक तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दानेश साखरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांची भेट घेऊन शहराच्या विकासासाठी चर्चा केली. यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांसोबत शहर विकासाच्या विविध विषयावर चर्चा केली.
 
Dharmarao Baba Atram
 
पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम Dharmarao Baba Atram हे 26 ऑक्टोबर रोजी गोंदिया येथे आलेले असताना दानेश साखरे यांनी त्यांची भेट घेऊन शहर विकासाच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. प्रसंगी दानेश साखरे यांनी अर्जुनी मोरगाव शहरातील थकीत वीज बिलामुळे बंद पडलेली नळयोजना व त्यातंर्गत 300 वर नळधारकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी गैरसोयीची समस्या पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच शहराच्या विकासात भर घालण्यासाठी प्रशस्त रस्ते, गटारे व सौंदर्यकरणावर चर्चा करुन नगरपंचायत स्थापनेपासून बंद असलेल्या मग्रोराहयोच्या कामांमुळे निर्माण होणारा रोजगाराचा प्रश्‍न मांडून शहरातील गरीब व कष्टकरी मजुरांना रोहयोची बारमाही कामे उपलब्ध करण्याची मागणी साखरे यांनी पालकमंत्र्यांकडे केली.