मानोरा,
Folk Art Festival प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेतून तयार झालेला आणि दक्षिण सांस्कृतिक विभाग नागपूर यांचे वतीने सादर केल्या जाणार्या लोककला महोत्सवाचे (यात्रा) आयोजन सोमवार ३० ऑटोंबर रोजी खूपसे सेलिब्रेशन हॉल येथे सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा मानोरा, नटश्री बहुद्देशीय संस्था, स्त्री शक्ती संस्था यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात संपूर्ण देशातून विविध राज्यातील ९० कलावंत सहभागी होणार आहेत. आप आपल्या राज्यातील सांस्कृतिक कलेचा परिचय ते करून देणार आहेत. Folk Art Festival लावणी, लोकनाट्य, नृत्य, विनोदी कार्यक्रम सादर केले जातील. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी, नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे, मुंबई नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, डॉ. महेश चव्हाण,सभापती सुजाता चव्हाण, तहसीलदार रवी राठोड, ठाणेदार प्रविण शिंदे, माजी प्राचार्य व्हि.बी.पाटील, भाजपा चे तालुका अध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ तालुयातील रसिक प्रेक्षकांनी घ्यावा, असे आवाहन अ. भा. मराठी नाट्य परिषद शाखा मानोरा चे अध्यक्ष डॉ. संजय रोठे, प्रमुख कार्यवाह यशवंत पद्मगिरवार, कोषाध्यक्ष माणिक डेरे, शाखेचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.