तभा वृत्तसेवा
वणी,
Velabai Phata to Bori : वणी तालुक्यातील वणी ते कोरपना मार्गावर कोळसा व सिमेंटच्या अनेक ट्रकमधून ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने वेळाबाई फाटा ते बोरी दरम्यान रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून मोठ्या प्रमाणात धूळ पसरत आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे असून धुळीमुळे रस्त्यावर नागरिकांना जाणे येणे खूप कठीण झाले आहे. या रस्त्यावर अनेक नागरिकांचे अपघात झाले आहेत.
या Velabai Phata to Bori रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करुन रस्ता नागरिकांचे सुलभ वाहतुकीसाठी तयार करावा यासाठी व इतर मागण्यांसाठी ढाकोरी येथील बसस्थानकाजवळ 26 ऑक्टोबरपासून साखळी उपोषण सुरू झाले आहे. 26 ऑक्टोबरला ढाकोरी येथील नागरिक उपोषणास बसले असुन यानंतर इतर गावचे सरपंच व नागरिक सहभागी होणार आहेत. रस्ता दुरुस्ती व इतर मागण्या साठी ढाकोरी, गोवारी, कुरई, निंबाळा, मुर्ती, देऊरवाडा, बोरी, डोर्ली इ गावातील सरपंच, उपसरपंच व इतर नागरिक सहभागी झाले आहे. यापुढील पाच दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन तीव‘ करुन आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा या परिसरातील सरपंचांनी दिला आहे.
रस्ता दुरुस्तीच्या मागणीशिवाय धुळीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी. Velabai Phata to Bori रस्त्यावर नियमितपणे पाणी मारण्यात यावे. मोहदा येथील गीट्टी क‘ेशर व इतर ओव्हरलोड वाहतूक बंद करावी, धुळीमुळे आरोग्यावर दुष्परिणाम झालेल्या शेतमजुराच्या आरोग्याची तपासणी करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात अजय कवरासे सरपंच ढाकोरी, नरेंद्र बदखल सरपंच गोवारी, योगेश आत्राम सरपंच बोरी, गीरीधरराव आगलावे सरपंच निंबळा, विजय ठाकरे उपसरपंच कुरई, सांबशिव मत्ते मूर्ती, बंडु टोंगे कुरई, डॉ. अशोक लोडे, लक्ष्मण इद्दे यांच्यासह अनेक नागरिक उपोषणस्थळी हजर राहून सहकार्य करीत आहेत.