शुद्ध आणि सात्विक प्रेमानेच संघ जगातील सर्वात मोठे संघटन

प्रांत सहसंपर्क प्रमुख मधुकर कुकडे

    दिनांक :29-Oct-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
Madhukar Kukde : संघाच्या शाखेत मिळणारे संस्कार आणि सातत्यपूर्ण चिकाटीसोबतच शुद्ध आणि सात्विक प्रेमानेच संघ जगातील सर्वात मोठे संघटन बनले असल्याचे प्रतिप्रादन प्रांत सहसंपर्क प्रमुख मधुकर कुकडे यांनी पांढरकवडा नगराच्या विजयादशमी उत्सवात केले. स्थानिक मित्र क्रीडा मंडळाच्या प्रांगणात विजयादशमी उत्सव तथा शस्त्रपूजन कार्यक‘मात कुकडे यांनी, संघाच्या एक तासाच्या शाखेत देशास परमवैभवास नेण्यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचे तंत्र शिकविल्या जात असून अनेक स्वयंसेवक समाजात मोठमोठे सेवा प्रकल्प प्रसिद्धीपासून दूर राहून करत आहेत, हाच संघाच्या संस्कार असल्याचे सांगितले.
 
Madhukar Kukde
 
संघाचे काम नागरिकांच्या सहकार्याने होत असून अनेक स्तरांवर सामाजिक बदल होण्यासाठी संघ कार्यरत असून या देशास परमवैभवास नेणे हेच संघाचे ध्येय आहे. Madhukar Kukde येणार्‍या शताब्दी वर्षात शेकडो लहानसहान उपक‘म व सेवाकार्ये केल्या जाणार असून नागरिकांनीसुद्धा लहान कृतीतून देश मोठा होण्यासाठी कार्य करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेकडो वर्षांचे राम मंदिराचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार असून या पिढीस हे मंदिर याची डोळा पाहण्याचे भाग्य मिळत आहे. याच वेळी काही व्यक्ती राजकीय इच्छा शक्ती पूर्ण करण्यासाठी जातीजातीत तेढ निर्माण करीत असल्याने अशा लोकांना नियंत्रित करण्याचा सोपा मार्ग म्हणजे शाखा वाढ करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी पांढरकवडा Madhukar Kukde येथील प्रतिष्ठित स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रतिभा तोडासे, जिल्हा संघचालक गोविंद हातगावकर, नगर संघचालक डॉ. किरण मायी उपस्थित होते. यावेळी वैयक्तिक गीत उदय कुळकर्णी यांनी सादर केले. तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन नगर कार्यवाह गोपाळ गायनर यांनी केले. यावेळी गावातील अनेक गणमान्य व्यक्ती, महिला उपस्थित होत्या. तत्पूर्वी गावातील प्रमुख मार्गाने घोषपथकाच्या तालावर पथसंचलन काढण्यात आले.