गोंदिया जिल्ह्यातील 43 जलाशय तुडूंब

03 Oct 2023 20:27:04
गोंदिया,
Gondia District : गेल्या वर्षापासून जिल्ह्यातील काही जलाशये पूर्णपणे भरत आहेत. यंदाही 43 जलाशये तुडूंब भरून ओसंडू वाहू लागले आहे. सात जलाशयांमध्ये 90 टक्केच्यावर साठा झाला आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. एकीकडे सलग पावसामुळे कमी कालावधीच्या धानाला फटका बसला आहे तर दुसरीकडे प्रकल्पांना फायदाही झाला. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात लहान-मोठे जवळपास 80 प्रकल्प आहेत.
 
Gondia District
 
राज्य शासनाच्या Gondia District लघुपाटबंधारे विभागांतर्गत 70 प्रकल्प व तलावांचा समावेश आहे. 5 मध्यम, 14 लघू आणि 20 माजी मालगुजारी तलाव शंभर टक्के भरले आहेत. एक मध्यम, तीन लघू प्रकल्प व तीन मामा तलावांत 90 टक्केच्यावर साठा आहे. बोदलकसा, चोरखमारा, रेंगेपार, कटंगी, कलपाथरी या मध्यम प्रकल्पांमध्ये शंभर टक्के साठा झाला आहे. डोंगरगाव, कालीमाती, मोगरा, नवेगावबांध, पिपरिया, सडेपार, उमरझरी, बेवारटोला, भुराटोला हे लघु प्रकल्पही शंभर टक्के भरले आहे. 38 जुन्या मालगुजारी तलावांपैकी 20 तलाव शंभर टक्के भरले असून ते ओसंडून वाहू लागले आहे. मध्यम प्रकल्प चुलबंद 74.30 टक्के, खैरबंदा 86.91 टक्के, मानगड लघू प्रकल्पात 87.83 टक्के साठा झाला आहे. आजपर्यंत 9 मध्यम प्रकल्पांत 91.77 टक्के, 23 लघू प्रकल्पांत 89.36 टक्के आणि 38 माजी मालगुजारी तलावांत 91.11 टक्के असा एकूण 70 प्रकल्पांत 90.72 टक्के पाणीसाठा झाला आहे.
 
 
गतवर्षीच्या तुलनेत 8.12 टक्के कमी साठा
गतवर्षी Gondia District याच तारखेत मध्यम प्रकल्पांमध्ये 97.93 टक्के, लघू प्रकल्पांमध्ये 99.78 टक्के, मामा तलावांत 99.32 टक्के असा एकूण 98.84 टक्के साठा होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेत 8.12 टक्के पाणीसाठा कमी आहे.
Powered By Sangraha 9.0