गोंदिया,
Police Retirement : जिल्हा पोलिस विभागात अनेक वर्ष सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचा 3 ऑक्टोबर रोजी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते सहकुटूंब सत्कार करण्यात आला. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला प्रभारी पोलिस उपअधिक्षक (गृह) नंदिनी चानपुरकर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
प्रसंगी सेवानिवृत्त झालेले Police Retirement सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजकुमार लक्ष्मण खरोले, कुवरलाल सितरु भगत, सोपराम तानबाजी ढेंगे आणि पोलिस हवालदार एकनाथ रामभाऊ सोनेवाने यांचा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छा पत्र, देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रभारी पोलिस उपअधिक्षक (गृह) नंदिनी चानपुरकर यांनी केले. आयोजनासाठी पोहवा राजू डोंगरे, राजू वैद्य यांनी सहकार्य केले.