रश्मी शुक्ला राज्याच्या पोलिस महासंचालक

- प्रथमच महिला अधिकार्‍याची नियुक्ती

    दिनांक :03-Oct-2023
Total Views |
मुंबई,
Rashmi Shukla : राज्याला पहिल्या महिला पोलिस महासंचालक मिळाल्या असून, वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची या पदावर मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने, त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली.
 
Rashmi Shukla
 
रजनीश सेठ 31 डिसेंबरला निवृत्त होणार होते. त्यापूर्वीच राज्य सरकारने त्यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर रश्मी शुक्ला राज्यातील सर्वांत वरिष्ठ पोलिस अधिकारी ठरल्या. (Rashmi Shukla) रश्मी शुक्ला या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर सशस्त्र सीमा बलच्या महासंचालक म्हणून कार्यररत आहेत. रश्मी शुक्ला यांचे नाव फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. त्यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती.
 
 
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर शिंदे-फडवणीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. (Rashmi Shukla) शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पुणे पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला आहे. यात काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कोर्टाने असा अहवाल स्वीकारला की केस बंद केली जाते. एखादा गुन्हा चुकून नोंदवला गेला किंवा तक‘ार दिवाणी स्वरूपाची असल्याचे आढळून आल्यास पोलिसांकडून ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला जातो.