श्री गोविंदप्रभू यांची जयंती उत्साहात साजरी

03 Oct 2023 17:30:47
तभा वृत्तसेवा
श्रीक्षेत्र माहूर
Govinda Prabhu's महानुभाव पंथियांचे चौथे कृष्ण भगवान श्री गोविंदप्रभू यांची जयंती स्थानिक मंगलाश्रम येथे बुधवारी साजरी करण्यात आली. यावेळी गोविंदप्रभू यांच्या अवतार कार्यावर श्री दत्तगड बेलोना येथील प्रदीप कपाटे यांचे प्रवचन झाले.प्रदीप कपाटे यांनी आपल्या प्रवचनातून श्री गोविंदप्रभू बाबा यांनी छोट्या छोट्या कृतीतून कसा अंधश्रद्धेवर प्रहार केला, कसे समाजहित साधले त्याची मांडणी केली. तसेच त्याकाळीची समाज व्यवस्था व विद्यमान स्थिती यातील फरक विशद करून आधुनिकता व परंपरा यातील चांगल्या गोष्टींचा अंगीकार करण्याचा सल्ला दिला.
 

गोविंदप्रभू जयंती  
 
संत व सदभक्तांच्या उपस्थित रात्री 10 वाजता जन्म विधीला प्रारंभ झाला. सर्वप्रथम प्रदीप कपाटे यांच्या हस्ते विशेषाला मंगल स्नान घालण्यात आले. तदनंतर विडाअवसर करण्यात येऊन आरती करण्यात आली. रात्रीला विष्णू पेंदोर, दिलीप पाटील, अशोक हूमने, राजू आराध्ये यांच्या भजन मंडळाचा कार्यक्रम पार पडला.Govinda Prabhu's दूसरे दिवशी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.या सोहळ्यासाठी दिनेश कपाटे, विकास कपाटे, सतीश आराध्ये, राजेश आराध्ये, देवेंद्र कपाटे, आदर्श विद्वान्स, अजिंक्य तळेगांवकर, प्रवीण विद्वान्स, सुरेश आराध्ये, राहुल आराध्ये, सचिन कपाटे, विजय आराध्ये, अजय विद्वान्स, दत्तात्रेय धुळधर, मंगेश कपाटे, वैभव हुमणे, जगदीश आराध्ये, अमोल आराध्ये, पवन पांढरे, विनोद वानखेडे, रोहित वाघमारेसह सर्वज्ञ मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0